सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया (Serum Institute of India) निर्मित कोविशिल्ड लस (Covishield Vaccine) आणि भारत बायोटेक (Bharat Biotech) लसीला आपात्कालीन वापरासाठी मान्यता नाकारण्यात आली आहे. अशी माहिती काही मीडिया रिपोर्ट्समधून समोर येत होती. आपात्कालीन वापरासाठी लसीला मान्यता देण्यासाठी सीरम इंस्टिस्ट्यूने CDSCO कडे तर भारत बायोटेक ने DCGI कडे अर्ज केला होता. मात्र अपूर्ण डेटा सादर केल्याने या लसींना मान्यता देण्यात आलेली नाही, असे काही मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले होते. परंतु, ही हे मीडिया रिपोर्ट्स खोटे असल्याचा खुलासा आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात आला आहे.
सीरम इंस्टिट्यूट आणि भारत बायोटेक च्या लसींना आपात्कालीन वापरासाठी मान्यता नाकारण्यात आल्याचे मीडिया रिपोट्स फेक असल्याचे स्पष्टीकरण आरोग्य मंत्रालयाने दिले आहे. (Bharat Biotech च्या Intranasal COVID-19 Vaccine ची मानवी चाचणी जानेवारी 2021 पासून होणार सुरू)
ANI Tweet:
The media report about the rejection of Serum Institute and Bharat Biotech's emergency use authorisation of vaccine is fake: Ministry of Health & Family Welfare pic.twitter.com/vysHrU43hi
— ANI (@ANI) December 9, 2020
हैदराबादमधील फार्मास्युटिकल फर्म भारत बायोटेक यांनी सोमवारी भारतीय औषध नियंत्रक जनरल (डीसीजीआयसी) कडे Covaxin या लसीच्या तातडीच्या वापराची अधिकृतता मिळवण्यासाठी अर्ज केला होता. ही लस भारतीय बायोटेक आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने एकत्रितपणे विकसित केली आहे. तर पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने अॅस्ट्रॅजेनेका-ऑक्सफोर्डच्या कोरोना व्हायरस लसीच्या आपात्कालीन वापराच्या अधिकृततेसाठी केंद्रीय औषध नियामकाकडे अर्ज केला होता.
भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया व्यतिरिक्त, Pfizer Inc ने देखील भारतात आपत्कालीन वापराच्या मंजुरीसाठी अर्ज केला आहे. या लसीला ब्रिटन आणि बहरीन या देशांमध्ये मंजूरी मिळाली आहे. दरम्यान, काही लसींना पुढील काही आठवड्यात परवानगी मिळण्याची शक्यता असल्याचे आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी सांगितले होते.