Vaccine | Image used for representational purpose (Photo Credits: Oxford Twitter)

भारतामध्ये 3 लसी सध्या कोविड 19 ला रोखण्यासाठी आपत्कालीन वापरासाठी तातडीची मंजुरी मिळावी म्हणून प्रतिक्षेत असताना भारत बायोटेक (Bharat Biotech) कडून अजून एका लसीबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. भारत बायोटेक आता इंटरनेसल लसीसाठी (Intranasal COVID-19 Vaccine) फेज 1 च्या मानवी चाचण्या लवकरच सुरू करणार आहे. लसीची निर्मिती करणार्‍या हैदराबादमधील भारत बायोटेकचे मॅनेजिंग डायरेक्टर Krishna Ella यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता जानेवारी 2021 मध्ये त्याची सुरूवात होणार आहे. Covaxin Covid 19 Vaccine Update: SII पाठोपाठ Bharat Biotech चा देखील Emergency Use Authorisation साठी DCGI कडे अर्ज.

TiE Global Summit (TGS) मध्ये व्हॅर्च्युअल सभेत बोलताना त्यांनी माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता लस निर्मितीसाठी अजून 2 फॅसिलिटीजची उभारणी केली जाणार आहे. यामध्ये कोवॅक्सिन सोबतच ही लस देखील बनवली जाणार आहे.

भारत बायोटेकची ही नवी इंटरनेसल लस ही नाकातून दिली जाणार आहे. त्याचा एकच शॉट दिला जाणार आहे. दरम्यान किरण मुझूमदार शॉ यांच्यासोबत बोलताना त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इतर लसींच्या तुलनेत या लसीच्या मानवी चाचण्या वेगाने होणार आहेत.

भारतासारख्या कोट्यावधींची लोकसंख्या असणार्‍या देशामध्ये intramuscular injections च्या स्वरूपात लस देताना प्रत्येकी 2 डोस म्हणजे 2.6 बिलियन सिरीज लागणार आहेत तर तितक्यास सूया लागतील. यामुळे पर्यावरणात प्रदूषणाचा देखील मोठा धोका आहे.

भारत बायोटेकच्या या लसीचे ट्रायल्स हे Saint LouisUniversity's Vaccine and Treatment Evaluation Unit मध्ये होणार आहेत. तर या ऑनलाईन सत्रामध्ये माहिती देताना इतर देशांच्या तुलनेत भारतामध्ये तयार होणार्‍या लसींची किंमत देखील कमी असेल असे सांगण्यात आले आहे.