आजपासून (1 एप्रिल) नव्या आर्थिक वर्षाला सुरूवात होत आहे. नव्या आर्थिक वर्षात पहिल्याच दिवसापासून आता अनेक नियमांमध्ये मोठे बदल करणयात आले आहेत. दर महिन्यातच पहिल्या दिवशी छोटे-मोठे बदल होत असतात. पण एप्रिल 2022 चा महिना महागाईची झळ पोहचवणारा असल्याचं पहायला मिळत आहे. यामध्ये पीएफ खात्यावर (PF Account) टॅक्स ते क्रिप्टोत गुंतवणूक (Cryptocurrencies) करणार्यांच्या उत्पन्नावर 30% टॅक्स असे अनेक नवे नियम लागू होत आहेत.
पीएफ अकाऊंट
1 एप्रिल 2022 पासून पीएफ अकाऊंटवर देखील टॅक्स लागणार आहे. सीबीडीटी ने Income-tax (25th Amendment) Rule 2021 लागू केली आहे. त्यामुळे आता 2.50 लाख रूपये करमुक्त असेल त्यावरील रक्कमेवरील व्याजावर टॅक्स आकारला जाणार आहे. तर सरकारी कर्मचार्यांच्या जीपीएफ मधील टॅक्स फ्री रक्कम प्रतिवर्षी 5 लाख आहे.
क्रिप्टो गुंतवणूक
नव्या आर्थिक वर्षात आता क्रिप्टो गुंतवणूक देखील बदलणार आहे. अर्थमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसर, सारी व्हर्च्युअल डिजिटल असेट किंवा क्रिप्टो वर 30% टॅक्स लागणार आहे. त्यामुळे क्रिप्टो करंसी विकून तुम्हांला जो फायदा होईल त्यावर टॅक्स सरकारला द्यावा लागेल. आणि विक्रीवर 1% टीडीएस देखील लागणार आहे. Union Budget 2021: बिटकॉईनसारख्या क्रिप्टोकरन्सीवर येणार बंदी; केंद्र सरकार डिजिटल करन्सी आणण्याच्या तयारीत .
औषधं महागली
औषधांचाही खर्च वाढला आहे. 800 आवश्यक औषधांची किंमत आजपासून 10.7% ने वाढणार आहेत.
पोस्ट ऑफिस
पोस्टातील एमआईएस,एससीएसएस सारख्या बचत योजनांमध्येही बदल होणार आहे. १ एप्रिलपासून या योजनांमधील व्याजाची रक्कम रोख स्वरूपात मिळणार नाही. यासाठी तुम्हाला बचत खाते उघडावे लागेल. याशिवाय ज्या ग्राहकांनी त्यांचे पोस्ट ऑफिस बचत खाते किंवा बँक खाते या योजनांशी जोडलेले नाही आणि अशा परिस्थितीत व्याज दिले जात नाही. त्यामुळे ते लिंक करणे आवश्यक असेल.
ई चलान
CBIC (Central Board of Indirect Taxes and Customs) ने वस्तू आणि सेवा कर (GST) अंतर्गत ई-चलान (इलेक्ट्रॉनिक चलन) जारी करण्याची मर्यादा 50 कोटी रुपयांच्या पूर्वीच्या निश्चित मर्यादेवरून 20 कोटी रुपये केली आहे. हा नियम आज 1 एप्रिल 2022 पासून लागू होत आहे.
अॅक्सिस बॅंक
अॅक्सिस बँकेत पगार किंवा बचत खाते असलेल्या ग्राहकांसाठी 1 एप्रिल 2022 पासून नवीन नियम लागू केले जात आहेत. बँकेने बचत खात्यातील किमान शिल्लक ठेवण्याची मर्यादा 10 हजारांवरून 12 हजार रुपये केली आहे. AXIC बँकेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, बँकेने मोफत रोख व्यवहारांची विहित मर्यादा देखील बदलून चार विनामूल्य व्यवहार किंवा 1.5 लाख रुपये केली आहे.