Sonia Gandhi and Rahul Gandhi |

अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) अर्थातच ईडी (ED) ने काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना नॅशनल हेराल्ड  (National Herald Case) प्रकरणी समन्स बजावले आहे. ईडीने हे समन्स आज (बुधवार, 1 जून) रोजी पाठवले आहे.  काँग्रेसने दावा केला आहे की, या प्रकरणाची चौकशी तपास यंत्रणेने 2015 मध्येच बंद केली होती. मात्र, केवळ विरोधकांना धमकावण्यासाठी आणि त्यांचा आवाज बंद करण्यासाठी केंद्र सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर कठपुतळी म्हणून करत आहे.

काँग्रेस नेते आणि ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी म्हटले आहे की, नॅशनल हेरॉल्डला मोठा इतिहास आहे. जो भारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्याच दिवसापासून सुरु होतो. आज केंद्रीय तपास यंत्रणा विरोधकांना नामोहरम करण्यासाठी वापरल्या जात आहेत. ममता बॅनर्जी, फारुख अब्दुल्ला यांच्यासह सर्व विरोधकांना केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून लक्ष्य केले जात आहे. सिंघवी यांनी पुढे म्हटले की, जवळपास सर्वच कंपन्या कर्ज घेऊन आपला ताळेबंद सुधारण्याचा प्रयत्न करतात. (हेही वाचा, National Herald Case: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची ED कडून चौकशी सुरू, नेमकी काय आहे प्रकरण? जाणून घ्या)

नॅशनल हेरॉर्ड प्रकरण इडीने 2015 मध्येच बंद केल. परंतू, केंद्र सरकारला बहुदा ते आवडले नाही. त्यामुळे या प्रकरणाचा तपास सुरु असलेल्या संबंधित अधिकाऱ्याला काढून टाकत हे प्रकरण पुन्हा नव्याने तपासासाठी उघडले जात आहे. देशात आज अनक मुद्दे आहेत. महागाईने जनता होरपळत आहे. परंतू, मूळ मुद्द्यांवरुन लक्ष्य हटविण्यासाठी अशी जुनीच प्रकरणे नव्याने काढली जात आहेत, असेही संघवी यांनी म्हटले.

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात सुमारे 2,000 कोटी रुपयांचा कथित अपहार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा संबंध मनी लॉन्ड्रींगशी जोडला जातोआहे. याच प्रकरणात आता राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. याच प्रकरणात या आधी ईडीने माजी केंद्रीय मंत्री पवन बन्सल, ज्येष्ठ काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची चौकशी केली.

ट्विट

काँग्रेस मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणारे नॅशनल हेरॉल्ड हे यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेडशी सलग्न करण्यात आले आहे. असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (एजेएल) च्या संपादनामध्ये फसवणूक, कट रचणे आणि विश्वासाचा भंग केल्याचा आरोप या प्रकरणात केला जातो आहे.