Indian Stock Market | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

भारतीय शेअर बाजार (Indian Stock Market) बुधवारी (19 मार्च) सकारात्मक कामगिरी (Market Trends) करताना पाहायला मिळाला. खरेदीदारांनी उत्साह दाखविल्याने गुंतवणुकदारांना काहीसा दिलासा मिळाला. आजच्या बाजारावर जागतिक स्टॉक मार्केटचा प्रभाव अधिक पाहायला मिळाला. आंतरराष्ट्रीय (Global Markets) पातळीवर होणाऱ्या सकारात्मक घटनांचे प्रतिबींब म्हणून BSE सेन्सेक्स (Sensex) आणि NSE निफ्टी (Nifty) वधारल्याचे मत बाजारतज्ज्ञांनी व्यक्त केले. आज सकाळी बाजार सुरु होताच पहिल्या सत्रात बीएसई सेन्सेक्स 29.56 अंकांनी किंवा0.04% ने वाढून 75,330.82 वर पोहोचला, तर राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) मधील निफ्टी 5019.70 अंकांनी म्हणजेच 0.09% ने वाढून 22,854.00 वर पोहोचला. जाणून घ्या आजचा बाजार ट्रेंड आणि वधारलेले स्टॉक्स. सोबत घसरलेल्या समभागांचीही माहिती.

बाजारातील वधार आणि घसरणीचा ट्रेण्ड

भारतीय शेअर बाजार आज बऱ्यापैकी वधारताना पाहायला मिळाला. ज्यामुळे काही समभाग दमदार कामगिरी करताना पाहायला मिळाले. तर काही समभागांमध्ये घसरणही झाली. बाजारातील समभागांचे चढ उतार खालील प्रमाणे:

बाजाराचा आढवा: वधार आणि घसरण

  1. प्रगतीशील शेअर्स: 1,767
  2. घटणारे शेअर्स: 523
  3. अपरिवर्तित शेअर्स: 117 (हेही वाचा, Indian Stock Market: भारतीय शेअर बाजार सकारात्मक: सेन्सेक्स, निफ्टी-50 मध्ये वधार, जाणून घ्या ट्रेंडींग स्टॉक्स)

सर्वाधिक नफा मिळवणारे आणि घसरलेले समभाग

सकाळी बाजार सुरु झाला तेव्हा काह समभाग पहिल्या सत्रात सर्वाधिक नफा कमावताना दिसले. तर दुसऱ्या बाजूला काही समभाग मोठ्या प्रमाणावर तोटा सहन करताना दिसले. दोन्ही प्रकारातील समभाग खालील प्रमाणे:

नफा मिळवणारे प्रमुख समभाग (NSE)

  • टाटा स्टील
  • जेएसडब्ल्यू स्टील
  • बजाज फिनसर्व्ह
  • एसबीआय
  • भारती एअरटेल

घसरलेले प्रमुख समभाग (NSE)

  • टीसीएस
  • एचसीएल टेक्नॉलॉजीज
  • टेक महिंद्रा
  • सिप्ला
  • ट्रेंट

बाजारातील ट्रेण्ड आणि तज्ज्ञांचे निरीक्षण

भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी दिसून आली, ज्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास आणखी मजबूत झाला. याबाबत निरीक्षण नोंदवताना तज्ज्ञांनी म्हटले की, बाजाराच्या वाढीला अनेक घटक पाठिंबा देत आहेत, ज्यात खालील बाबींचा समावेश आहे:

  • वित्तीय खर्चाची गती
  • आर्थिक परिस्थिती सुलभ राहणे
  • सुधारित आर्थिक आणि कॉर्पोरेट कमाईचा अंदाज
  • परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार (एफपीआय) आवक

वृत्तसंस्था आयएनएसने दिलेल्या वृत्तानुसार, बँकिंग आणि बाजार तज्ञ अजय बग्गा यांच्या मते, भारताचे वाजवी मूल्यांकन आणि आरबीआयच्या चलनविषयक धोरणांमुळे आशावाद निर्माण होत आहे. तथापि, यूएस फेडच्या निर्णयांबद्दलच्या चिंता दिवसाच्या उत्तरार्धात काही नफा-बुकिंगला चालना देऊ शकतात.

निफ्टीचा प्रमुख प्रतिकार आणि आधार पातळी

प्रॉफिट आयडियाचे एमडी वरुण अग्रवाल यांनी बाजारातील प्रमुख ट्रेंड्सवर प्रकाश टाकला:

  • मजबूत प्रतिकार:  23,000-23,400 पातळी
  • आधार क्षेत्र: 22,300 पातळी
  • तात्काळ आधार: 22,700 पातळी

त्यांनी नमूद केले की, 22,700-22,800 प्रतिकार क्षेत्रापेक्षा निफ्टीचा तेजीचा ब्रेकआउट सकारात्मक अल्पकालीन ट्रेंड दर्शवितो.

दरम्यान, जागतिक बाजारपेठांमध्ये सकारात्मक तेजी दिसून येत असल्याने, गुंतवणूकदार शाश्वत वाढीसाठी प्रमुख बाजार पातळींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. हा ट्रेण्ड असाच राहिल्यास नजिकच्या काळात भारतीय शेअर बाजारात मोठ वधार पाहायला मिळू शकेल.