Artificial intelligence Scam: कृत्रिम बुद्धीमत्ता वापरुन आवाज क्लोन करत एका महिलेची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. हा एक प्रकारचा नवा एआय घोटाळा असल्याचे मानले जात आहे. या प्रकारच्या घोटाळ्यामुळे सोशल मीडियावर चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच, पोलीसही सतर्क झाले आहेत. एक्स वापरकर्ता कावेरीने नावाच्या महिलेने तिला आलेला अनुभव आणि तिच्यासोबत घडलेल्या घटनेचा वृत्तांत कथन केला. X वरील एका लांबलचक पोस्टमध्ये, महिलेने सांगितले की जेव्हा तिला एका अज्ञात नंबरवरून कॉल आला. फोनवरील व्यक्तीने सांगितले की, तुमच्या मुलीला अटक झाली आहे. धक्कादायक म्हणजे त्या व्यक्तीने मला एक आवाज ऐकवला. हा आवाज माझ्या मुलीच्या आवाजाशी मिळताजुळता होता.
व्हॉइस क्लोनिंग घोटाळा:
कावेरीने एका अनोळखी नंबरवरून कॉल आल्याचे सांगितले. जिथे एका बनावट पोलीस अधिकाऱ्याने तिची मुलगी अडचणीत असल्याचा दावा केला. स्कॅमरने तिच्या मुलीच्या आवाजाची नक्कल केली आणि तिच्या सुटकेच्या बदल्यात पैशाची मागणी केली, आवाज क्लोन करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात आला होता. (हेही वाचा, AI to Hit Jobs: एआयमुळे जगभरातील 40% नोकऱ्या येऊ शकतात धोक्यात; IMF ने दिला इशारा, श्रीमंत देशांना जास्त धोका)
भयानक चकमक:
एका तपशीलवार पोस्टमध्ये, कावेरीने त्या फेक कॉलचे वर्णन केले. घोटाळेबाजाने तिच्या मुलीचा एका गंभीर प्रकरात सहभाग असल्याचा आरोप केला आणि तिला अटक करण्यात आल्याची माहिती दिली. तिच्या सुटकेसाठी मोठी आर्थिक रक्कम द्यावी लागेल, असे सांगून तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्याला मुलीचा आवाज ऐकवण्याचा प्रयत्न केला. परंतू, त्यांच्यावर विश्वास न ठेवता मी थेट माझ्या मुलीशी संपर्क साधला असता असे काहीच घडले नसल्याचे तिने सांगितले. ज्यामुळे घोटाळेबाज उघडे पडले आणि महिला फसवणुकीपासून वाचली. (हेही वाचा: AI Death Calculator: आता जाणून घेता येईल नक्की कधी होईल तुमचा मृत्यू; एआय टूल व्यक्त करणार अंदाज, जाणून घ्या सविस्तर)
घोटाळेबाजांचे डावपेच:
आरोपींनी संपर्क साधताच कावेरीने तिच्या मुलीशी बोलण्याचा आग्रह धरला तेव्हा बनावट पोलीस अधिकाधिक आक्रमक झाला. त्याने धमक्या देण्यास सुरुवात केली. परंतू, कावेरीने संयम राखला आणि मागण्यांचे पालन करण्यास नकार दिला.
एक्स पोस्ट
⚠️Scam Alert⚠️
I got a call about an hour ago from an unknown number. I unusually do not respond to unknown numbers but I don't know what made me answer this call.
On the other end was a guy who said he is a cop and asked me if I knew where my daughter K is. He said K gave...
— Kaveri 🇮🇳 (@ikaveri) March 11, 2024
सोशल मीडिया प्रतिसाद:
कावेरीची पोस्ट असंख्य सोशल मीडिया वापरकर्त्यांनी पाहिली. त्यानंतर वापरकर्त्यांनी त्यांना आलेले अनुभवही सांगितले. वापरकर्त्यांनी व्यक्त केलेल्या भावना आणि माहितीनुसार, अनेक घोटाळेबाजांनी पैसे उकळण्यासाठी किंवा भीती पसरवण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांची तोतयागिरी केली आहे.
सुरक्षा उपाय:
ऑनलाई, सायबर आणि एआय घोटाळेबाजांपासून दूर राहण्यासाठी आपली गॅझेट्स सुरुक्षीत ठेवा. त्यासाठी त्याचे पासवर्ड क्लिष्ट ठेवा. आपल्या गोपनीय, खासगी माहितीचे जाहीर प्रदर्शन करु नका. आपला प्रवास, उत्पन्न, कौटुंबीक कलह यांबाबत कोणालाही माहिती देऊ नका.