SBI Hikes MCLR: एसबीआयच्या मुदत कर्ज व्याजदरात 10-15% वाढ, EMI महागणार
SBI | (Photo Credits: PTI)

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आजपासून मुदत कर्ज व्याजदरात (MCLR) 10-15 बेसिस पॉइंट्सने वाढ करत आहे. या प्रकारच्या कर्जाच्या व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय एसबीआयने यापूर्वीच घेतला आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी आजपासून (15 नोव्हेंबर) होत आहे. त्यामुळे MCLR प्रकारातील कर्ज घेतलेल्या एसबीआय कर्जदारांना कर्जापोटी आकारल्या जाणाऱ्या व्याजदराची रक्कम वाढीव भरावा लागणार आहे. म्हणजेच कर्जाचा EMI महागणार आहे. सर्वसामान्य नागरिक आगोदर महागाईच्या झळांनी होपरपळत आहेत. त्यातच कर्जांच्या व्याजदरांचे हाप्ते अधिकचे वाढल्याने 'दुष्काळात तेरावा महिना' अशीच गत कर्जदारांची होताना पाहायला मिळत आहे.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, एसबीायच्या एक महिना ते तीन महिना कालावधी करता घेतलेल्या MCLR कर्ज दरासाठी 7.60% व्याजदर होता. तो वाढून 7.75% इतका झाला आहे. सहा महिने आणि एक वर्षाचा कालावधी असलेले MCLR कर्ज 7.90% इतक्या व्याजदराने दिले जायचे. आता त्यासाठी 8.05 % व्याजदार आकारला जाईल. तीन वर्षांचा MCLR कालावधीसाटी 8.25% वरुन ते थेट 8.35% इतकी वाढ करण्यात आली आहे. (हेही वाचा, SBI Xpress Credit Personal Loan: आता फक्त एका Missed Call किंवा SMS वर मिळेल 20 लाखांपर्यंत कर्ज; जाणून घ्या पात्रता व अटी)

MCLR म्हणजे काय: .. सोमवारी निधी-आधारित कर्ज दरांची किरकोळ किंमत म्हणजे Marginal Cost of Funds Based Landing Rate (MCLR). हा एक प्रकारची कर्ज दराची सीमांत किंमत मानली जाते. ज्यावर बँका ग्राहकांना कर्ज देऊ शकतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने सन 2016 मध्ये विविध प्रकारच्या कर्जावरील व्याजदर निर्धारित करण्यासाठी ही पद्धत सुरु केली आहे. तेव्हापासून बँका MCLR नुसार कर्जपुरवठा करतात. अभ्यासक सांगतात की, MCLR मध्ये होणारा कोणताही बदल हा कर्जदाराच्या व्याजदरावर थेट परिणाम करतो. कारण त्यामुळेच तर व्याज दर वाढतात. सहाजिकच कर्जदारास अधिकचा EMI भरावा लागतो.