SBI Xpress Credit Personal Loan: स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) एक्सप्रेस क्रेडिट पर्सनल लोन (Xpress Credit Personal Loan) सुविधा सुरू केली आहे. हे कर्ज त्वरित उपलब्ध होईल आणि सहजतेने मंजूर होईल, असे बँकेचे म्हणणं आहे. एसबीआय खातेधारक ज्यांचे बँकेत पगाराचे खाते आहे आणि त्यांचे मासिक उत्पन्न 15,000 रुपये आहे ते एक्सप्रेस क्रेडिट पर्सनल लोनसाठी अर्ज करू शकतात.
एसबीआयच्या एक्सप्रेस क्रेडिट पर्सनल लोन सुविधेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना फक्त मिस कॉल (Missed Call) किंवा मेसेज (SMS) करावा लागतो. एसबीआयने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, ही सुविधा एसएमएसद्वारे उपलब्ध होईल आणि आपण 7208933145 वर संदेश लिहून कर्जासाठी अर्ज करू शकता. दुसऱ्या एका ट्वीटमध्ये बँकेने लिहिलं आहे की, पर्सनल लोन घेणे खूप सोपे झाले आहे आणि 7208933142 या क्रमांकावर मिस कॉल देऊन तुम्हीदेखील कर्ज घेऊ शकता. (वाचा - Bank Holiday in February 2021: फेब्रुवारी महिन्यात बँकेत जाण्यापूर्वी 'या' सुट्टीच्या तारखा नक्की लक्षात ठेवा)
All it takes is an SMS, to begin with your personal loan process.
SMS <PERSONAL> on 7208933145.
To know more: https://t.co/TH5bnGWu1V pic.twitter.com/EJin90BhxV
— State Bank of India (@TheOfficialSBI) February 16, 2021
SBI Xpress Credit Personal Loan कर्जाची वैशिष्ट्ये -
- 20 लाखांपर्यंतचे कर्ज मिळणार
- कमी व्याज दर
- दैनंदिन शिल्लक राशीवर व्याज.
- प्रक्रिया शुल्क कमी.
- किमान दस्तऐवज
- शून्य हिडन कास्ट
- दुसर्या कर्जाचीही तरतूद
SBI Xpress Credit Personal Loan साठी पात्रता -
- एसबीआयमध्ये पगार खाते असणे आवश्यक आहे.
- किमान मासिक उत्पन्न 25,000 रुपये असावे.
- किमान कर्जाची रक्कम - 25,000 रुपये
- कमाल कर्जाची रक्कम - 20 लाख रुपये
SBI Xpress Credit Personal Loan -
SBI Xpress Credit Personal Loan वर व्याज दर 9.60% आहे.
ग्राहकाला एसबीआय एक्सप्रेस क्रेडिट पर्सनल लोनसाठी अर्ज करण्यासाठी, 7208933142 नंबरवर मिस कॉल द्यावा लागेल. एसबीआय एक्सप्रेस क्रेडिट पर्सनल लोनसाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही 720893333145 या क्रमांकावर PERSONAL लिहून एसएमएस पाठवू शकता.