किरकोळ बाजाराला महागाईचा फटका तर औद्योगिक उत्पादनाला दिलासा
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Videoblocks)

राज्यात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईचा फटका पुन्हा एकदा नागरिकांना बसला आहे. खासकरुन या महागाईचा फटका किरकोळ बाजाराला जास्त झाला असून नोव्हेंबर महिन्यातील त्याचे दर 4.62 टक्क्यांवरुन 5.54 टक्के झाला आहे. तर ऑक्टोंबर महिन्यात औद्योगिक उत्पादन दराला सप्टेंबर महिन्यापेक्षा थोडा दिलासा मिळाला आहे. हा दर गेल्या तीन वर्षातील सर्वात जास्त दर असल्याचे सांगण्यात येत आहे.

ऑक्टोंबर महिन्यात किरकोळ बाजारात महागाईचा दर 4.62 टक्के होता. तर सप्टेंबर महिन्यात हा दर 3.99 झाला होता. मात्र नोव्हेंबर महिन्यात किरकोळ बाजारातील दर हा गेल्या तीन वर्षातील उच्चांकी दर असल्याची बाब समोर आली आहे. यापूर्वी जुलै 2016 मध्ये महागाई दर 6.07 टक्के होता. आकडेवारीनुसार पाहिल्यास कांदा, टोमॅटो आणि अन्य भाज्यांच्या दर सुद्धा कडाडले आहेत. तर हे दर नोव्हेंबर महिन्यात यापूर्वीच्या दराच्या तुलनेत अधिक झाले आहेत. सीपीआय यांची फूडमध्ये हिस्सा 45.9 टक्के आहे. सप्टेंबर महिन्यात कांद्याचे दर 45.3 टक्क्यांनी वाढले. तर ऑक्टोंबर महिन्यात कांद्याचे दर 19.6 टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले.(GST काउंसिलची बैठक 18 डिसेंबरला पार पडणार, दैनंदिन जीवनातील 'या' गोष्टींवरील करात वाढ होऊ शकते)

ANI Tweet: 

मात्र दुसऱ्या बाजूला औद्योगिक उत्पादन दर 4.3 टक्क्यांच्या तुलनेत ऑक्टोंबर महिन्यात 3.8 टक्के राहिला. औद्योगिक क्षेत्रात सुधारणा होत असल्याची गोष्ट ही सरकारसाठी एक दिलासादायक आहे. परंतु किरकोळ बाजारातील महागाईवर तोडगा काढण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. तर अर्थव्यवस्थेमधील मंदी दूर करण्यासाठी आरबीआय सातत्याने त्यांच्या रेपो रेट मध्ये कपात करत आहे. यावर्षात आरबीआयने रेपो रेटमध्ये 1.35 टक्क्यांपर्यंत कपात केली असून सध्या रेपो रेट 5.15 टक्के आहे.