GST काउंसिलची बैठक 18 डिसेंबरला पार पडणार, दैनंदिन जीवनातील 'या' गोष्टींवरील करात वाढ होऊ शकते
प्रतिकात्मक फोटो Photo Credit: PTI

येत्या 18 डिसेंबर 2019 रोजी जीएसटी काउंसिलची (GST Council) बैठक पार पडणार असून कराबाबत (Tax) बदलाव करण्यात येण्याची शक्यता आहे. जीएसटीमधून आतापर्यंत वसूली पुरेशी झालेली नाही. त्यामुळेच केंद्र आणि जीएसटी कलेक्शन यांच्यावरील दबाव वाढला आहे. अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखालील जीएसटी काउंसिल बैठक पुढच्या आठवड्यात होणार आहे. जीएसटी संबंधित सर्व निर्णय जीएसटी काउंसिलमध्ये घेतले जातात. जर जीएसटीच्या करात बदल केल्यास काही गोष्टींवर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यानुसार रॉ सिल्क, आलिशान हेल्थकेअर, ब्रँन्डेड रीसियल्स, पिझ्झा, रेस्टॉरेंट, क्रुझ, शिपिंग, प्रिंट जाहीरात, वातानुकुलित ट्रेन तिकिट, ऑलिव्ह ऑईळ यांसारख्या वस्तूंवरील करात वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचसोबत जीएसटी स्लॅबमध्ये सुद्धा बदल करण्याचा विचार केला जात आहे. सर्वात कमी स्लॅब म्हणजेच 5 टक्के आहे तो वाढवून 6 ते 8 टक्के केला जाऊ शकतो.

जीएसटी अंतर्गत सध्या 5 टक्के, 12 टक्के, 18 टक्के आणि 28 टक्क्यांनुसार कराची वसूली केली जाते. त्याचसोबत 28 टक्के असलेल्या श्रेणीत येणाऱ्या वस्तूंवर अतिरिक्त कर लावण्यात येतो. केंद्र आणि राज्यातील अधिकाऱ्यांची मंगळवारी पार पडलेल्या बैठकीत जीएसटीच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यामध्ये 5 टक्के कर वाढवून 8 टक्के आणि 12 टक्के कर वाढवून 18 टक्के करण्याचा विचार करण्यात आला आहे. तर सरकारी आकड्यांनुसार एप्रिल ते नोव्हेंबर या महिन्यात केंद्रीय जीएसटी वसूली 2019-20 च्या बजेटच्या नुसार 40 टक्के कमी झाली आहे. या काळात जीएसटी 3,28,365 रुपये होता मात्र तो 5,26,000 रुपये झाला आहे.

2017 मध्ये जीएसटी लागू झाल्यानंतर टॅक्सचा महसूलात कपाताची समस्या वाढली आहे. केंद्र सरकारने जीएसटी लागू केल्यानंतर प्रभावी टॅक्स दर 14.4 टक्क्यांवरुन 11.6 टक्क्यांवर पोहचला आहे. यामुळे वर्षाला दोन लाख करोड रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याचसोबत देशात सुरु असलेल्या आर्थिक मंदीचा सुद्धा याला फटका बसला आहे. तर बिझनेस स्टॅंडर्ड यांनी त्यांच्या एका रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, जीएसटी स्लॅबमध्ये बदल केल्यास त्यामधून महसूल प्रत्येक महिन्याला 1 हजार कोटींची वाढ होणार आहे.