GST दर 10 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता, सामान्यांच्या खिशाला लागणार झटका
GST | Representational Image | (Photo Credits: PTI)

देशभरात जीएसटी (GST) लागून जवळजवळ दीड वर्ष झाले. या कालावधी दरम्यान जीएसटी काउंन्सिलकडून टॅक्स दराबाबत काही बदल करण्यात आले. तर आता 5 टक्क्यांवरु जीएसटी दर 9 ते 10 टक्क्यांपर्यंत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे आता सामान्यांच्या खिशाला अधिक झटका लागणार आहे. कर महसूल वाढवण्यासाठी जीएसटी काउंसिल 12 टक्क्यांचा कर स्लॅब काढून टाकत त्याच्याअंतर्गत येणाऱ्या सर्व 243 प्रोडक्ट्सवर 18 टक्क्यांपर्यंत करु शकतो. त्याचसोबत सध्या 1 हजार रुपयांचे भाडे असणाऱ्या हॉटेलच्या खोलीवर बिलावेळी टॅक्स द्यावा लागत नाही.

2017 मध्ये जीएसटी लागू झाल्यानंतर टॅक्सचा महसूलात कपाताची समस्या वाढली आहे. केंद्र सरकारने जीएसटी लागू केल्यानंतर प्रभावी टॅक्स दर 14.4 टक्क्यांवरुन 11.6 टक्क्यांवर पोहचला आहे. यामुळे वर्षाला दोन लाख करोड रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याचसोबत देशात सुरु असलेल्या आर्थिक मंदीचा सुद्धा याला फटका बसला आहे. तर बिझनेस स्टॅंडर्ड यांनी त्यांच्या एका रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, जीएसटी स्लॅबमध्ये बदल केल्यास त्यामधून महसूल प्रत्येक महिन्याला 1 हजार कोटींची वाढ होणार आहे.(वाहन खरेदी होणार आणखी स्वस्त?; अर्थसंकल्पात GST 28 वरून 18 टक्के होण्याची शक्यता)

तर सप्टेंबर महिन्यात पार पडलेल्या जीएसटी काउंसिल बैठकीत हॉटेलच्या भाड्यासोबत आकारण्यात येणाऱ्या जीएसटी दरात घट करण्यात आली आहे. त्यामुळे आता नागरिकांना हॉटेल मध्ये राहण्यासाठी रुम खिशाला परवडणाऱ्या पैशांमध्ये उपलब्ध होणार आहेत. तर 1 हजार रुपयांपासून ते 7500 रुपयापर्यंतच्या हॉटेल भाड्यासोबत 12 टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे. तसेच 7500 रुपयांपेक्षा अधिक भाडे असलेल्या हॉटेलच्या रुमवर 18 टक्के जीएसटी लावण्यात येणार आहे.