Mukesh Ambani, Reliance Industries Limited (Photo Credit- FB/Wikimedia Commons)

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा भारताने ऑपरेशन सिंदूर मधून बदला घेतला आहे. भारतीय सवाष्ण महिलांचं कूंकू पुसण्याचा प्रयत्न करणार्‍या दहशतवाद्यांना भारताने 'ऑपरेशन सिंदूर' मधून प्रत्युत्तर दिल्यानंतर सध्या सर्वत्र या नावाची चर्चा आहे. अशामध्ये आता ऑनलाईन माध्यमातून रिलायंस इंडस्ट्रीने 'Operation Sindoor'या नावासाठी ट्रेडमार्क रिक्वेस्ट टाकल्याची माहिती पसरली होती. त्यावर Reliance Industriesने परिपत्रक जारी करत खुलासा केला आहे. अब्धाधीश उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कंपनीने आपण या बाबतची ट्रेडमार्क रिक्वेस्ट मागे घेत असल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान ही रिक्वेस्ट एका ज्युनियरने कोणतीही परवानगी न घेता टाकल्याचंही त्यांनी स्पष्ट केले आहे.

'Operation Sindoor' साठी चार रिक्वेस्ट आल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये पहिली रिक्वेस्ट 7 मे दिवशी सकाळी 10.42 ला रिलायंस कडून करण्यात आल्याचं दिसत आहे. पुढील 24 तासांत मनोरंजन, शिक्षण, सांस्कृतिक आणि माध्यम सेवांचा समावेश असलेल्या कायद्याच्या Class 41 अंतर्गत विशेष हक्कांसाठी 3 अर्ज दाखल करण्यात आले, असे एएनआयने वृत्त दिले आहे.

Reliance Industries ने जारी केलं स्टेटमेंट

भारतीय लष्करी कारवायांची नावे सरकारकडून intellectual property म्हणून आपोआप संरक्षित केली जात नाहीत, संरक्षण मंत्रालयही अनेकदा या नावांची नोंदणी किंवा व्यापारीकरण करत नाही आणि ती कोणत्याही विशेष वैधानिक आयपी फ्रेमवर्क अंतर्गत सुरक्षित केलेली नाहीत. म्हणून जोपर्यंत सरकार किंवा संरक्षण मंत्रालय हस्तक्षेप करत नाही तोपर्यंत अशी नावे संस्था किंवा खाजगी व्यक्तींकडून ट्रेडमार्क दाव्यांसाठी खुली राहतात. Operation Sindoor च्या ब्रिफिंग देणार्‍या Colonel Sophia Qureshi आणि Wing Commander Vyomika Singh कोण? 

भारताचा ट्रेडमार्क कायदा रजिस्ट्रारला दिशाभूल करणारे, आक्षेपार्ह किंवा सार्वजनिक धोरणाच्या विरुद्ध असलेले ट्रेडमार्क अर्ज नाकारण्याचा अधिकार देतो. दाखल करण्याची तारीख आणि वेळ महत्त्वाची असली तरी, भारतीय ट्रेडमार्क कायदा पहिल्या फाइलरला ट्रेडमार्क अधिकारांची हमी देत ​​नाही, या प्रकरणात रिलायन्स इंडस्ट्रीज ट्रेडमार्कवर दावा करू शकते.