Colonel Sophia Qureshi and Wing Commander Vyomika Singh, | X @ANI

पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये कुटुंबियांसमोरच 26 पुरूषांच्या डोक्यात गोळ्या झाडत दहशतवाद्यांनी केलेल्या क्रुर हल्ल्याचा आज (7 मे) भारताने बदला घेतला आहे. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानी आणि पाकव्याप्त कश्मीर मध्ये घुसून भारताने 9 दहशतवादी तळांवर हल्लाबोल केला. या हल्ल्याची माहिती Wing Commander Vyomika Singh,आणि Colonel Sophia Qureshi या दोन महिला अधिकार्‍यांनी आज दिली आहे. त्यांच्यासोबत Foreign Secretary Vikram Misri होते. भारताने केलेला हा हल्ला ठोस गुप्तचर संघटनांनी दिलेल्या माहितीनुसार टार्गेटेट हल्ला होता. यामध्ये दहशतवादी तळांना उद्वस्त करण्यात आलं असून नागरिकांना हात लावण्यात आला नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दहशतवाद्यांना पोसण्यात पाकिस्तान महत्त्वाची भूमिका बजावत आहे आणि आज भारताने पहलगाम हल्ल्याच्या आपला प्रतिहल्ल्याचा हक्क बजावला असल्याचं म्हटलं आहे. नक्की वाचा: Operation Sindoor ने भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त कश्मीर मध्ये कोणत्या 9 दहशतवादी तळांना लक्ष्य केलं? पहा यादी .

दरम्यान Wing Commander Vyomika Singh,आणि Colonel Sophia Qureshi यांनी भारताने लक्ष्य केलेली ठिकाणं त्याठिकाणी कोणते दहशतवादी तळ ठोकून होते याची माहिती दिली आहे. मग जाणून घ्या नेमक्या या दोन वरिष्ठ अधिकारी नेमक्या कोण?

कर्नल सोफिया कुरेशी

कर्नल कुरेशी या  मूळच्या गुजरातच्या आहेत. बायोकेमिस्ट्रीमध्ये पदव्युत्तर आहे. त्या एका लष्करी कुटुंबातून येतात. त्यांचे आजोबा भारतीय सैन्यात होते. त्यांचे लग्न मेकॅनाइज्ड इन्फंट्रीमधील एका अधिकाऱ्याशी झाले आहे. सहा वर्षे त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या शांती मोहिमेत (पीकेओ) काम केले आहे. त्या Corps of Signals, मध्ये अधिकारी आहेत. 2016 मध्ये, कर्नल कुरेशी यांनी ASEAN प्लस बहुराष्ट्रीय क्षेत्रीय प्रशिक्षण सराव, फोर्स 18 मध्ये भारतीय सैन्य प्रशिक्षण पथकाचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी बनून इतिहास रचला.

विंग कमांडर व्योमिका सिंग

व्योमिका या नावातच तिच्या ध्येयाची माहिती मिळते. व्योमिका म्हणजे आकाशात राहणारी किंवा आकाश कन्या. तिने नॅशनल कॅडेट कॉर्प्स (एनसीसी) मध्ये सामील होऊन तिचे ध्येय गाठले आणि नंतर तिने तिचे अभियांत्रिकी मध्ये शिक्षण पूर्ण केले. सशस्त्र दलात सामील होणारी ती तिच्या कुटुंबातील पहिली व्यक्ती आहे. तिला भारतीय हवाई दलात हेलिकॉप्टर पायलट म्हणून नियुक्त करण्यात आले आणि 18 डिसेंबर 2019 रोजी तिला फ्लाइंग ब्रांचमध्ये कायमस्वरूपी कमिशन मिळाले. विंग कमांडर सिंग ने 2500 हून अधिक तास उड्डाण केले आहे. त्यांनी जम्मू-काश्मीर आणि ईशान्येसह काही कठीण प्रदेशात चेतक आणि चित्ता सारखी हेलिकॉप्टर चालवली आहेत.