पहलगाम मध्ये 26 पर्यटकांची निर्घुण हत्या केल्यानंतर त्याचा बदला आज भारताने ऑपरेशन सिंदूर च्या माध्यमातून भारताने घेतला आहे. मध्यरात्री 1.44 च्या सुमारास पाकिस्तान आणि पाकव्याप्त कश्मीर मध्ये घुसून भारतीय लष्कराने 9 दहशतवादी तळांवर हल्ला केला आहे. यामध्ये मरकज सुभान अल्लाह, बहावलपूर - (JeM), मरकज तैयबा, मुरीदके - (LeT), सरजल, तेहरा कलान - (JeM), मेहमूना जोया, सियालकोट - (HM), मरकज अहले हदीस, बर्नाला -  (LeT), मरकज अब्बास, कोटली - (JeM), मस्कर राहील शाहिद, कोटली - (HM), शवाई नाला कॅम्प, मुझफ्फराबाद -  (LeT), सय्यदना बिलाल कॅम्प, मुझफ्फराबाद - (JeM) यांचा समावेश असल्याचं सांगण्यात आलं आहे. Indus Water Treaty Suspension: 'भारताचे पाणी केवळ देशाच्या हितासाठीच वाहणार, इथेच राहणार आणि कामी येणार'; PM Narendra Modi यांचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर (Video).  

पाकिस्तान, पाकव्याप्त कश्मीर मध्ये 9 दहशतवादी तळांवर हल्ला

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)