Indus Water Treaty Suspension: 'भारताचे पाणी केवळ देशाच्या हितासाठीच वाहणार, इथेच राहणार आणि कामी येणार'; PM Narendra Modi यांचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर (Video)
सिंधू जल करार हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सहा नद्यांच्या पाणीवाटपाचे नियमन करणारा महत्त्वाचा करार आहे. करार स्थगित केल्यानंतर भारताने जम्मू-काश्मीरमधील सलाल आणि बगलिहार जलविद्युत प्रकल्पांमध्ये जलाशयांची साठवण क्षमता वाढवण्यास सुरुवात केली आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार संपुष्टात आणला आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथमच सार्वजनिक विधान केले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले, भारताचे पाणी पूर्वी बाहेर जात असे, आता ते भारताच्या हितासाठी राहील आणि देशासाठी उपयुक्त ठरेल. म्हणजेच, जे पाणी पूर्वी भारताच्या सीमेबाहेर वाहत होते, ते पाणी आता भारत सरकार थांबवून देशाच्या हितासाठी वापरण्याची योजना आखत आहे. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात पाकिस्तानचे नाव घेतले नसले तरी, तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी घोषणाबाजी सुरू केली. यावर पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘तुम्हाला खूप लवकर समजले’, यावरून स्पष्ट होते की, पीएम मोदींचे पाकिस्तानला हे सडेतोड उत्तर आहे.
22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता, ज्यामुळे भारताने 24 एप्रिल रोजी 1960 चा सिंधू जल करार करार स्थगित करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. सिंधू जल करार हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सहा नद्यांच्या पाणीवाटपाचे नियमन करणारा महत्त्वाचा करार आहे. करार स्थगित केल्यानंतर भारताने जम्मू-काश्मीरमधील सलाल आणि बगलिहार जलविद्युत प्रकल्पांमध्ये जलाशयांची साठवण क्षमता वाढवण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय, चिनाब नदीवरील बगलिहार धरणातून पाण्याचा प्रवाह तात्पुरता थांबवण्यात आला. भारताने धरणांमधील गाळ काढण्यासाठी पाण्याचा प्रवाह सोडला, जो सामान्यतः ऑगस्टमध्ये केला जातो, परंतु यावेळी मे महिन्यातच ही प्रक्रिया केली गेली. यामुळे पाकिस्तानच्या शेती आणि पिण्याच्या पाण्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे, कारण सिंधू नदी प्रणालीवर पाकिस्तानची 80 टक्के शेती अवलंबून आहे.
Indus Water Treaty Suspension:
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 06, 2025 10:40 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

