Mukesh Ambani | File Image | (Photo Credits: PTI)

देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या पगारात गेल्या 11 वर्षापासून एकदाही वाढ झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये प्रत्येक वर्षाला 15 कोटी रुपये पगार मिळतो. त्यानुसार आतापर्यंत एवढाच पगार त्यांना मिळत असून एका रुपयाचीसुद्धा त्यामध्ये वाढ झालेली नाही. 31 मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात कंपनीच्या डायरेक्टर्स यांचा पगार मात्र वाढला आहे. तर एप्रिल-जून या तीन महिन्यात रिलायन्स इंडस्ट्रीजला एकूण नफा 10,104 करोड रुपये झाला आहे.

तसेच हायड्रोकार्बन मार्केट आणि कमकुवत ग्लोबल संकेतांची चिंता होती तरीही कंपनीला पहिल्या तीन महिन्यात उत्तम निकाल दिसून आले. तसेच रिफायनिंग उद्योगधंद्यातसुद्धा उत्तम कामगिरी केली आहे. आरईएल यांनी जाहीर केलेल्या वार्षिक रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, मुकेश अंबानी यांचा पगार 15 करोड रुपये ठरवण्यात आला आहे.(बद्रीनाथ, केदारनाथ चरणी मुकेश अंबानी यांच्याकडून 2 कोटींचे दान)

परंतु आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये मुकेश अंबानी यांना 4.45 करोड रुपये पगार आणि भत्त्याच्या रुपात देण्यात आला होता. तसेच पगार आणि भत्ता मिळून 2017-18 मध्ये सुद्धा 4.49 करोड रुपये ठेवण्यात आला होता. मात्र अंबानी यांनी आपला पगार स्थिर ठेवण्यात यावा अशी घोषणा 2009 मध्ये केली होती.