Rail Budget 2019: मोदी सरकारच्या रेल्वे बजेटमध्ये काय असेल खास?
Piyush Goyal (Photo Credits: PTI)

मोदी सरकारच्या कारर्दीतले हे सहावे आणि शेवटचे बजेट असून आज पियुष गोयल (Piyush Goyal) अंतरिम बजेट (Interim Budget) सादर करतील. या बजेटकडून वेगवेगळ्या क्षेत्राच्या विविध आशा आहेत. या बजेटमध्ये रेल्वे बजेटचाही सहभाग आहे.

यंदा तिसऱ्यांदा रेल्वे बजेट हे सर्वसाधारण बजेटसोबत सादर होणार आहे. यापूर्वी रेल्वे बजेट सर्वसाधारण बजेटच्या एक दिवसापूर्वी सादर होत असे. मात्र मोदी सरकारने 92 वर्षांची परंपरा मोडीत काढून रेल्वे बजेट आणि सर्वसाधारण बजेट एकाच दिवशी केले. या बजेट अंतर्गत रेल्वेसंबंधित अनेक घोषणा होऊ शकतात. (मोदी सरकारकडून मध्यमवर्गीयांना मिळू शकते ही भेट)

उत्तर भारतीयांसाठी यंदाच बजेट अधिक लाभदायी ठरु शकते. वृत्तानुसार, उत्तर भारतासाठी नव्या ट्रेन्सची घोषणा केली जाऊ शकते. तसंच मॉर्डन सिग्नल सिस्टम लावल्या जातील आणि प्रवाशांच्या सुविधेसाठी अनेक स्टेशन्सवर एस्केलेटर्स लावण्यात येतील. या बजेटमध्ये रेल्वेला विद्युतीकरणासाठी अतिरिक्त रक्कम देण्यात येण्याची आशा आहे. त्याचबरोबर रेल्वे स्टेशन आणि रेल्वेचे डब्बे यांचे आधुनिकीकरणावर जोर दिला जाईल. त्याचबरोबर आधुनिक ट्रेन्सच्या निर्मितीवरही भर देण्यात येईल. (Interim Budget म्हणजे काय? कसा तयार केला जातो भारताचा अर्थसंकल्प?)

गेल्या वर्षीच्या रेल्वे बजेटमध्ये प्रवाशांच्या सुविधेसाठी 25 हजाराहून अधिक प्रवाशांची वर्दळ असणाऱ्या रेल्वे स्टेशन्सवर एस्केलेटर्स लावण्याची घोषणा केली होती. तसंच रेल्वे स्टेशन्सवर वायफाय आणि सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येतील. 600 मोठ्या रेल्वे स्टेशन्सचा पुनर्विकास करण्यात येणार होते. त्याचबरोबर 36000 किमी च्या नव्या रेल्वे लाईन्स टाकण्याचेही आश्वासन गेल्या रेल्वे बजेटमध्ये देण्यात आले होते.