पंतप्रधान नरेंद्र मोदी (Photo Credit: IANS)

14 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर (November) या दरम्यान इंडोनेशियातील (Indonesia) बाली (Bali) येथे शिखर परिषद (G20 Summit) पार पडणार आहे. या परिषदेत जगातील तब्बल 19 देश हजेरी लावणार आहेत. यांत अर्जेंटिना (Argentina), ऑस्ट्रेलिया (Australia), ब्राझील (Brazil), कॅनडा (Canada), चीन (China), जर्मनी (Germany), फ्रान्स (France), भारत (India), इंडोनेशिया (Indonesia), इटली (Italy), जपान (Japan), कोरिया (Korea), मेक्सिको (Mexico), रशियन (Russia), सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका (South Africa), तुर्की (Turkey), यूके (UK) आणि यूएसचा (US) समावेश आहे. सध्या G20 चे अध्यक्षपद इंडोनेशियाकडे आहे. पण ही सतरावी  G20 शिखर परिषद भारतासाठी खुप महत्वाची आहे कारण इंडोनेशिया G20 शिखर परिषदेचं अध्यक्षपद भारताला सोपवणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) या परिषदेस आपली उल्लेखनिय उपस्थिती दर्शवणार आहे. तरी इंडोनेशियाच्या दिशेने रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी G20 शिखर परिषदेतील भारताच्या भुमिकेबद्दल माहिती दिली आहे.

 

बाली येथील G20 शिखर परिषदेदरम्यान, जागतिक अन्न आणि ऊर्जा सुरक्षा (Food And Energy Security), पर्यावरण (Environment), आरोग्य (Health) आणि डिजिटल परिवर्तन (Digital Evolution) यासारख्या जागतिक चिंतेच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर इतर G20 नेत्यांशी विस्तृत चर्चा करणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) दिली आहे. तसेच G20 शिखर परिषदेत सहभागी झालेल्या विविध नेत्यांना भेटून मी त्यांच्यासोबत भारताच्या द्विपक्षीय संबंधांमधील प्रगतीचा आढावा घेईन, अंस पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं आहे. (हे ही वाचा:- G-20 Summit: G-20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी PM Narendra Modi जाणार इंडोनेशियाला, 'या' प्रश्नी होणार चर्चा)

 

G20 शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या बालीमधील भारतीय समुदायाला संबोधीत करणार आहे. तसेच या समारोप समारंभा दरम्यान इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विडोडो G20 शिखर परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे सोपवतील. यांनुसार पुढील महिन्यापासून म्हणजेच १ डिसेंबरपासून भारत अधिकृतपणे G20  चे अध्यक्षपद स्वीकारणार आहे, अशी विस्तारीत माहिती पंतप्रधान मोदींनी दिली आहे.