Petrol Diesel Price Today: इंधन भाव स्थिरच! जाणून घ्या देशातील प्रमुख शहरांतील पेट्रोल, डिझेल दर
Petrol, Diesel Prices Today | (Photo credit - File Manager)

देशभरातील पेट्रोल आणि डिझेल (Petrol Diesel Price Today) दरात ग्राहकांना पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे. आजही (20 जानेवारी) इंधन दरात कोणत्याही प्रकारचे बदल झाले नाहीत. दर स्थिरच आहेत. दर स्थिर राहण्याचा आजचा 51वा दिवस आहे. इंधन दर स्थिर राहिले असले तरीही ते सर्वसामान्यांसाठी अधिकच आहेत. मधल्या काळात केंद्र सरकारने आणि काही राज्यांनी जीएसटी कमी केल्याने हे दर काहीसे घटले खरे. मात्र, ते ग्राहकांसाठी मोठा फायदा घेऊन येताना दिसले नाहीत. जीएसटी कमी केल्याने स्वस्त झालेले इंधन दर ग्राहकांना सवलत देण्यात अगदीच तोकडे ठरल्याचे पाहायला मिळते. जाणून घ्या देशातील प्रमुख शहरांतील इंधन दर.

राजधानी दिल्लीत पेट्रोल 95.41 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लीटर तर आर्थिक राजधानी मुंबई शहरात 109.98 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लीटर दराने विकले जात आहे. सोबतच कोलकाता येथे पेट्रोल 104.67 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 89.79 रुपये आणि चेन्नईध्ये पेट्रोल 101.40 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लीटर दराने विकले जात आहे. जाणून घ्या इतर शहरांतील दर. (हेही वाचा, Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल दर दररोज घ्या जाणून फक्त एका SMS च्या माध्यमातून)

शहर पेट्रोल (रुपये/लीटर) डिझेल (रुपये/लीटर)
श्रीगंगानगर 112.11 95.26
पोर्ट ब्लेयर 82.96 77.13
जयपुर 107.06 90.7
दिल्ली 95.41 86.67
मुंबई 109.98 94.14
चेन्नई 101.4 91.43
कोलकाता 104.67 89.79
भोपाल 107.23 90.87
रांची 98.52 91.56
बेंगलुरु 100.58 85.01
पटना 105.9 91.09

पेट्रोल-डिझेल दर दररोज बदलत असतात. दररोज सकाळी 6 वाजता या दरांबाबत अद्ययावत माहिती दिली जाते. पेट्रोल-डिझेल दर आपण एसएमएस (SMS) करुनही पाहू शकता. इंडियन ऑयलच्या कस्टमर केअर RSP सोबत शहराचा कोड लिहून तो 9224992249 या क्रमांकावर आणि BPCL ग्राहक असाल तर RSP लिहून 9223112222 संदेश पाठवा. आपणास इंधनाचे दर समजू शकतील. HPCL ग्राहक HPPrice लिहून 9222201122 क्रमांकावर संदेश पाठवूनही माहिती मिळवू शकतात.