Cyber Crime | Photo Credits: Pixabay.com

सध्या सोशल मीडियात अशा खुप गोष्टी आपण पाहतो ज्याचा थेट परिणाम आपल्या मुलांवर सुद्धा होऊ शकतो. अशा वेळी पालकांनी आपल्या मुलांसोबत खेळीमेळीचे नाते ठेवणे योग्य ठरु शकते. याच कारणास्तव आता नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरो यांनी दिलेल्या माहितीनुसार 2019 मध्ये मुलांसोबत सायबर क्राइम झाल्याच्या 305 घटना घडल्याची माहिती दिली आहे. त्यामुळेच तुमच्या मुलासोबत सुद्धा सायबर क्राइम होऊ नये यासाठी त्यांनी पालकांना काही महत्वाच्या सुचना सुद्धा दिल्या आहेत.(सोशल मीडियातील महिलांचे न्यूड फोटो 24 तासात हटवावे-रविशंकर प्रसाद)

सायबर बुलिंग हा एक गुन्हा आहे. त्यामुळे जर तुमच्या मुलासोबत सायबर बुलिंग होत असेल तर त्याला त्यापासून दूर ठेवावे. त्याचसोबत एखादा मुलाला चिडवत असेल तर त्याने लगेच पालकांना त्याबद्दल सांगावे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या मुलांना असे शिकवा की त्यांनी एखादी खासगी माहिती किंवा पैशांबद्दलची माहिती सोशल मीडियात शेअर करु नका. त्यामुळे पुढे जाऊन तुम्हाला त्याचा फटका बसू शकतो.(महिलांनी काय परिधान करावं आणि कसं रहावं यावर न्यायाधीशांनी भाष्य करणं टाळावं - सर्वोच्च न्यायालय) 

Tweet:

तर मुलांसाठी व्हिडिओ पाहणे ही अत्यंत साधी गोष्ट आहे. परंतु त्यामध्ये असलेल्या लिंक्स किंवा कंन्टेट हा काही वेळेस अनधिकृत असू शकतो. त्यामुळे मुलांनी जर अशा काही गोष्टी पाहिल्यास त्यांनी त्या तातडीने पालकांना सांगाव्यात.त्याचसोबत मुख्य गोष्ट म्हणजे जर तुमच्या मुलासोबत सायबर क्राइम होत असल्याचे तुमच्या लक्षात आल्यास तुम्ही National Cyber Crime Reporting Portal वर जाऊन तेथे तक्रार करु शकता. येथे ऑनलाईन पद्धतीने तक्रार नोंदवली जात असून खासकरुन महिला आणि मुलांवर होणाऱ्या अत्याचाराबद्दल अधिक लक्ष दिले जाते.