केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री डॉ. रविशंकर प्रसाद (Ravi Shankar Prasad) यांनी गुरुवारी राज्यसभेत एक महत्वाचे विधान केले आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, नव्या मार्गदर्शक सुचनांनुसार एखाद्या महिलेचा Nude or Muffed फोटो सोशल मीडियात पोस्ट केल्यास तो 24 तासात हटवावा. रविशंकर प्रसाद यांनी प्रश्न विचारले असता त्यांना उत्तरे देताना हे स्पष्ट केले आहे. रविशंकर प्रसाद यांनी असे ही म्हटले की, इंटरनेटवर साम्राज्यवाद (Internet imperialism) स्विकार नसून ही मक्तेदारी सरकार होऊ देणार नाही.तसेच निवडणूकांना प्रभावित करण्यासंबंधित सुद्धा कोणताच धोका नाही आहे. कारण मंत्रालय हे निवडणूक आयोगासोबत मिळून काम करत आहे.
रविशंकर प्रसाद यांनी असे ही स्पष्ट केले की, कोणतीही गोष्ट जी भारताच्या किंवा जनतेच्या आदेशाच्या विरोधातील आहेत त्या मार्गदर्शक सुचनांनुसार 36 तासांच्या आतमध्ये हटवाव्यात. सोशल मीडिया कंपन्यांना युजर्सची सत्यता दाखवण्यासाठी आहे. पण त्यावर खोट्या बातम्या किंवा अफवा परसवण्यासाठी नाही आहे. ते ऐच्छिक असेल व त्यात सरकारची कोणतीही भूमिका असणार नाही असे ही रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे.(Coronavirus in India: भारतातील कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांसह राज्यांच्या प्रमुखांना दिला 'हा' सल्ला)
सरकार टीकांचा सामना करण्यासाठी सुद्धा तयार असल्याचे रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे. यावर कोणतीही प्रतिबंध नसणार आहे. काँग्रेस खासदार शक्ती सिंह गोहिल यांनी मंत्र्यांना असे विचारले होते की, जर युजर्स फेक असल्यास त्याची ओळख कशी पटणार. यावर मंत्र्यांनी असे स्पष्ट केले की, त्याची जबाबदारी कंपनीवर असणार आहे.