Odisha Train Accident | (Photo Credits: Twitter)

Odisha Train Tragedy Updates: ओडिशा राज्यातील बालासोर (, Balasore Train Traged) येथे घडलेल्या रेल्वे अपघातामुळे अवघा देश हादरुन गेला. या अपघातात आतापर्यंत 275 नागरिकांचा मृत्यू झाल्याचा आणि सुमारे 1000 हून अधिक प्रवासी जखमी झाल्याचा अधिकृत आकडा आहे. रेल्वे प्रशासनाने युद्धपातळीवर यंत्रणा राबवून अपघातग्रस्त ठिकाणचा रेल्वेमार्ग दुरुस्त (Odisha Train Tragedy Developments) केला. वाहतूकही पूर्ववत झालीखरी. मात्र, अपघातग्रस्त पीडिताचे प्रश्न आणि समस्या अद्यापही सुटल्या नाहीत. दुर्घटनेनंतर सध्यास्थितीबाबत काही महत्त्वाचे मुद्दे. घ्या जाणून.

मृतदेहांची ओळख पटणे अद्यापी बाकी

रेल्व अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अद्यापही बालासोर रेल्वे अपघातातील तब्बल 101 मृतदेहांची ओळख पटणे बाकी आहे. त्यामुळे या मृतदेहांचे करायचे काय? हा प्रश्न प्रशासनासमोर कायम आहे. (हेही वाचा, Odisha Train Tragedy: बालासोर रेल्वे अपघाताच्या FIR मध्ये गुन्हेगारी निष्काळजीपणाचा आरोप; CBI आजपासून करणार तपास)

रुग्णांवर अद्यापही उपचार सुरु

पूर्व मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक रिंकेश रॉय यांनी वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना सांगितले की, रेल्वे अपघातातील जखमींवर अद्यापही ओडीशा राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत.

उपचार घेऊन 900 जण घरी परतले

रिकेश रॉय यांनी पुढे बोलताना सांगितले की, अपघातात साधारण 1100 लोक जखमी झाले होते. त्यापैकी जवळपास 900 जणांना उपचार करुन बरे आराम मिळाल्यानंतर घरी पाठवण्यात आले आहे. उर्वरीत 200 जणांवर अद्यापही उपचार सुरु आहेत. दुसऱ्या बाजूला 278 पैकी जवळपास 178 मृतदेहांची ओळख पटली आहे. मात्र उर्वरीत मृतदेहांची ओळख पटणे अद्यापही बाकी आहे.

दोन पॅसेंजर आणि एका मालगाडीत धडक

बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस, कोरोमंडल एक्स्प्रेस आणि आणखी एक मालगाडी अशा तीन गाड्या एकमेरांवर आदळल्याने ही दुर्घटना घडली. ज्यामध्ये 175 प्रवाशांचे प्राण अनाठाई गेले.

भुवनेश्वरमधील 55 मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात

भुवनेश्वर येथे ठेवण्यात आलेल्या एकूण 193 मृतदेहांपैकी 80 मृतदेहांची ओळख पटली आहे. 55 मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. अशी माहिती भुवनेश्वर महानगरपालिकेचे आयुक्त विजय अमृत कुलंगे यांनी एएनआयशी बोलताना दिली.

ओडिशा रेल्वे अपघात शुक्रवारी (2 जून) घडला. तीन गाड्यांना झालेल्या अपघातात 275 लोकांचा मृत्यू झाला आणि 1,175 हून अधिक लोक जखमी झाले. चेन्नईच्या दिशेने जाणारी शालिमार-चेन्नई सेंट्रल कोरोमंडल एक्सप्रेस रुळावरून घसरल्याने हा भीषण अपघात झाला. शेजारच्या रुळावर असलेल्या मालगाडीला ती धडकली, त्यामुळे कोरोमंडल एक्स्प्रेसची मागची गाडी तिसऱ्या ट्रॅकवर गेली. तिसऱ्या ट्रॅकवर विरुद्ध दिशेने येणारी बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस रुळावरून घसरलेल्या डब्यांना धडकली. त्यातून ही दुर्घटना घडली.