Government Jobs 2023 | (File Photo)

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने (Nuclear Power Corporation Of India Limited) डेप्युटी मॅनेजर (Deputy Manager) आणि कनिष्ठ हिंदी अनुवादक (Junior Hindi Translator) पदांच्या 128 जागांसाठी उमेदवारांची भरती करण्यासाठी भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. इच्छुक उमेदवार 12 मे 2023 पासून त्यांचे ऑनलाइन अर्ज सबमिट करु शकता. इथे आपण प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेनुसार NPCIL Recruitment 2023 साठी महत्त्वाच्या तारखा, रिक्त जागा, पगार आदी गोष्टींबाबत तपशील दिला आहे. हा तपशील वाचून आपण अधिक माहिती आणि माहितीच्या अचुकतेसाठी NPCIL च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

NPCIL 128 रिक्त जागांसाठी अधिसूचना जारी

NPCIL मध्ये विविध पदांसाठी 6 मे 2023 रोजी भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्रता निकष, आवश्यक अनुभव, निवड प्रक्रिया इत्यादींचा समावेश असलेली तपशीलवार जाहिरात www.npcilcareers.co.in या अधिकृत वेबसाइटवर पाहू शकता. (हेही वाचा, Government Jobs 2023: सरकारी नोकरीची संधी! पदे, पदसंख्या, कसा आणि कुठे कराल अर्ज? घ्या जाणून)

भरतीबद्दल अधिक माहिती

  • संस्था- ऑर्गनायझेशन न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड
  • परीक्षेचे नाव- NPCIL परीक्षा 2023
  • पद- डेप्युटी मॅनेजर, कनिष्ठ हिंदी अनुवादक
  • रिक्त जागा- 128
  • श्रेणी-सरकारी नोकरी
  • अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
  • अधिकृत वेबसाइट www.npcilcareers.co.in

NPCIL भर्ती 2023: महत्त्वाच्या तारखा

  • NPCIL भरती 2023 अधिसूचना- 06 मे 2023
  • NPCIL भरती ऑनलाइन अर्ज 12 मे 2023 (10:00 AM) पासून सुरू होईल
  • NPCIL भरती अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मे 2023 (05:00 PM)

NPCIL भर्ती 2023: रिक्त जागा आणि पदे

  • उपव्यवस्थापक (HR)- 48
  • उपव्यवस्थापक (F&A)- 32
  • उपव्यवस्थापक (C&MM-) 42
  • उपव्यवस्थापक (कायदेशीर)- 02
  • कनिष्ठ हिंदी अनुवादक- 04

    एकूण- 128

NPCIL भर्ती 2023: वयोमर्यादा (किमान आणि कमाल वय)

  • उपव्यवस्थापक- 18 वर्षे ते 30 वर्षे
  • कनिष्ठ हिंदी अनुवादक- 18 वर्षे ते 28 वर्षे

NPCIL 2023 भर्ती : वेतन

  • उपव्यवस्थापक- रु.56,100/-

    वेतन स्तर-10

  • कनिष्ठ हिंदी अनुवादक- रु.35,400/-

    वेतन स्तर-6

ट्विट

NPCIL बद्दल थोडक्यात

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) ही मुंबई, महाराष्ट्र येथे स्थित भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे. हे संपूर्णपणे भारत सरकारच्या मालकीचे आहे आणि अणुऊर्जेपासून वीज निर्मितीसाठी जबाबदार आहे. NPCIL हे अणुऊर्जा विभाग (DAE) द्वारे प्रशासित केले जाते.