Boring Jobs | Representational Image (Photo Credits: Pixabay)

AIIMS Delhi Nursing Officers Notification 2022: तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. .. आणि त्यातही तुम्ही जर वैद्यकीय शिक्षण घेतले असेल तर मग तुमचा मार्ग आणखीच सोपा होतो. होय, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS), नवी दिल्ली यांनी नर्सिंग ऑफिसरच्या पदासाठी अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक व पात्र उमेदवार या अधिसूचनेला अनूसरुन अर्ज करु शकतात. त्यासाठी पदांची संख्या, पात्रता आणि कुठे आणि कसा अर्ज कारायचा ते घ्या जाणून.

प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेनुसार ही भरती राष्ट्रीय क्षयरोग आणि श्वसन रोग संस्था (NITRD), नवी दिल्ली आणि AIIMS नवी दिल्ली आणि इतर AIIMS मध्ये केली जाईल. AIIMS अर्जदारांची निवड नर्सिंग ऑफिसर रिक्रूटमेंट कॉमन एलिजिबिलिटी टेस्ट (NORCET) द्वारे करेल जी 03 जून 2023 (शनिवार) रोजी घेतली जाईल.

अर्ज करण्याची पद्धत

इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन प्रक्रियेद्वारे अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांना www.aiimsexams.ac.in या वेबसाइटवरून विहित पदासांठी अर्ज ऑनलाईन प्रक्रियेद्वारे भरावा लागेल. अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 12 एप्रील ते 5 मे सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत असणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी थेट लिंक आणि अधिसूचना लिंक देखील इथे देण्यात आली आहे. (हेही वाचा, EPFO Recruitment 2023: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेत 2859 स्टेनो आणि SSA भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; 'असा' करा अर्ज)

नर्सिंग ऑफिसर या पदासाठी 3055 जागा भरल्या जाणार आहेत. या पदासाठी सातव्या श्रेणीनुसार वेतन (44900-142400) निश्चित केले जाऊ शकते. परीक्षेसाठी 12 एप्रिल ते 05 मे 2023 या कालावधी अर्ज करणे बंधनकारक आहे. अर्ज भरण्याची आणि परिक्षेची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनेच पार पडेल. अधिक माहितीसाठी norcet4.aiimsexams.ac.in या संकेतस्थळाला भेट द्या. जे अधिकृत आहे.