EPFO Recruitment 2023: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेत 2859 स्टेनो आणि SSA भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; 'असा' करा अर्ज

भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) मध्ये 2800 हून अधिक सरकारी नोकऱ्यांसाठी अर्ज प्रक्रिया आज सोमवार, 27 मार्च 2023 पासून सुरू झाली आहे.

EPFO Recruitment 2023: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेत 2859 स्टेनो आणि SSA भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; 'असा' करा अर्ज
Government Jobs 2023 | (File Photo)

EPFO Recruitment 2023: EPFO मध्ये सरकारी नोकऱ्या शोधणारे 12वी, पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) मध्ये 2800 हून अधिक सरकारी नोकऱ्यांसाठी अर्ज प्रक्रिया आज सोमवार, 27 मार्च 2023 पासून सुरू झाली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे ही भरती प्रक्रिया आयोजित केली जात आहे.

NTA ने जारी केलेल्या EPFO ​​भर्ती 2023 च्या अधिसूचनेनुसार, 12वी पास गट C अंतर्गत स्टेनोग्राफरच्या 185 पदांसह एकूण 2859 पदांसाठी आणि पदवीधरांसाठी सामाजिक सुरक्षा सहाय्यक (SSA) च्या 2674 पदांसह एकूण 2859 पदांसाठी भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 27 मार्चला सुरू होईल. तसेच या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 एप्रिल 2023 पर्यंत चालणार आहे. (हेही वाचा - IAF Agniveer Vayu 2023: वायुसेनेत अग्निवीरवायू भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; 'असा' करा अर्ज)

जाहिरातीनुसार स्टेनोग्राफर ग्रुप सी आणि सोशल सिक्युरिटी असिस्टंट (SSA) या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार NTA, recruitment.nta.nic.in किंवा या भरती पोर्टलशी संबंधित अर्ज पृष्ठाला भेट देऊन अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रियेचा एक भाग म्हणून, उमेदवारांना प्रथम नोंदणी करावी लागेल आणि नंतर नोंदणीकृत तपशीलांसह लॉग इन करून, उमेदवार त्यांचे अर्ज सबमिट करू शकतील.

अर्ज करण्यासाठी शुल्क -

अर्जाची फी 700 रुपये आहे, जी अर्जादरम्यानच ऑनलाइन माध्यमातून भरावी लागेल. SC, ST, दिव्यांग प्रवर्ग तसेच सर्व महिला उमेदवारांना फी भरण्याची गरज नाही. अर्ज करण्यापूर्वी भरती अधिसूचना वाचणे आवश्यक आहे.

EPFO ​​स्टेनो, SSA भरतीसाठी पात्रता -

स्टेनोग्राफर गट C साठी, उमेदवारांनी 10+2 उत्तीर्ण केलेले असावेत आणि त्यांना 80 wpm वेगाने डिक्टेशन घेता आले पाहिजे आणि इंग्रजीमध्ये 65 wpm आणि हिंदीमध्ये 50 wpm वेगाने ट्रांसक्रिप्शन करता येणं गरजेचं आहे. त्याच वेळी, एसएसए पदांसाठी, पदवीधर असणे आवश्यक आहे आणि संगणकावर हिंदीमध्ये 30 शब्द किंवा इंग्रजीमध्ये 35 शब्द प्रति मिनिट टंकलेखन गती असणे आवश्यक आहे.

(The above story first appeared on LatestLY on Mar 27, 2023 02:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).