
Satellite Tolling India: टोल वसुली करण्यासाठी FASTag ऐवजी उपग्रहाधारित प्रणाली (ANPR Tolling System) वापरली जाणार आहे आणि ही प्रणाली येत्या 1 मे पासून लागू होणार असल्याचे वृत्त सोशल मीडिया आणि काही मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमांतूनही प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने अधिकृत स्पष्टीकरण (NHAI Toll Clarification) जारी करत खंडण केले आहे. सरकारने पुष्टी केली की, असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही आणि FASTag हा प्राथमिक टोल वसूल करण्याची पद्धत (FASTag News 2025) म्हणून वापरात राहील. केंद्र सरकारने याबाबत एक पत्रकही जारी केले आहे.
मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात काय म्हटले?
रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय किंवा भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) यांनी 1 मे 2025 पासून उपग्रहाधारित टोल प्रणाली देशभर लागू करण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही.
ANPR आधारित बॅरिअरलेस टोलिंग प्रणाली निवडक टोल नाक्यांवर
उपग्रहाधारित टोलिंग ऐवजी, सरकारने ANPR (Automatic Number Plate Recognition) आणि FASTag प्रणालीचे संमिश्र मॉडेल तयार केले आहे, जे 'बॅरिअरलेस टोलिंग सिस्टम' म्हणून काही निवडक टोल नाक्यांवर प्रायोगिक तत्त्वावर लागू केले जाणार आहे. या प्रणालीअंतर्गत खालील बाबींचा समावेश असेल. (हेही वाचा, FASTag Mandatory: फास्टटॅग नसल्यास 1 एप्रिलपासून दुप्पट भरावा लागणार टोल; पहा कसा बनवायचा फास्टटॅग ऑनलाईन, ऑफलाईन)
- उच्च क्षमतेचे ANPR कॅमेरे वाहनांची क्रमांक प्लेट स्कॅन करून ओळखतील
- त्याच वेळी FASTag (RFID) द्वारे टोल रक्कम वसूल केली जाईल
- वाहन थांबवण्याची आवश्यकता राहणार नाही
- टोल न भरल्यास E-Notice पाठवले जाईल
थकबाकी असल्यास FASTag सस्पेंड होईल तसेच VAHAN प्रणालीअंतर्गत दंडात्मक कारवाई होऊ शकते
NHAI ने या प्रणालीसाठी निविदा आमंत्रित केल्या आहेत. प्रणालीच्या कार्यक्षमता, वापरकर्ता अनुभव आणि परिणामकारकतेनुसार देशभरात अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे मंत्रालयाने सांगितले आहे.
FASTag प्रणाली कायम; युजर्ससाठी सुलभ पर्याय
मंत्रालयाने स्पष्ट केले की, सर्व राष्ट्रीय महामार्ग टोल नाके ICD 2.5 प्रोटोकॉलवर चालतात, ज्यामुळे टॅगची स्थिती रिअल टाइममध्ये तपासता येते. FASTag वापरकर्ते टोल नाक्यावर पोहोचण्यापूर्वी कधीही रिचार्ज करू शकतात.
सहज सेवा मिळवण्यासाठी ग्राहकांनी काय करावे?
- FASTag वॉलेट UPI, सेव्हिंग्स किंवा चालू खात्याशी लिंक करून ऑटो-रिचार्ज अॅक्टिवेट करावा
- UPI, नेट बँकिंग, डेबिट/क्रेडिट कार्ड यांसारख्या विविध पर्यायांद्वारे रिचार्ज करता येतो
अलीकडील काही वृत्तांमध्ये दावा करण्यात आला होता की, भारतात 1 मेपासून उपग्रहाधारित टोल प्रणाली लागू केली जाणार आहे, ज्यामुळे वाहनचालक आणि ट्रान्सपोर्टरमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, सरकारच्या या स्पष्टीकरणामुळे अफवांना पूर्णविराम मिळाला आहे आणि स्पष्ट झाले आहे की, सरकार सुधारणा टप्प्याटप्प्याने लागू करत आहे, अचानक नाही. ANPR + FASTag मॉडेल हे भारताच्या स्मार्ट मोबिलिटी आणि क्यू-फ्री टोलिंग दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.