कोहिमा-दिमापूर राष्ट्रीय महामार्गावर (Kohima-Dimapur National Highway) झालेल्या एका भीषण अपघातामुळे अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे. या अपघातात दोन ठार आणि तीन जण गंभीर जखमी झाले आणि उभ्या असलेल्या दोन कारचा चक्काचूर झाला. वेदनादायी बाब अशी की, हा अपघात कणत्याही मानवी चुकीमुळे झाला नाही. पावसामुळे झालेल्या वाहतूक कोंडीमुळे अनेक वाहने रस्त्यावर उभी होती. दरम्यान, दरड कोसळी आणि उंच डोंगरावरुन एक मोठा दगड खाली घरंगळत आला. जो उभ्या असलेल्या या दोन्ही कारवर आदळला आणि ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ (Rock Crushes Cars Video ) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना कोहिमा-दिमापूर राष्ट्रीय महामार्गावर चुमुकेदिमा येथे पोलीस चौकीजवळ मंगळवारी (4 जुलै) घडली. अपघाताच्या या घनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वृत्तसंस्था एएनआयनेही हा व्हिडिओ आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. या घटनेच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक मोठा दगड एकामागून एक दोन कारला आदळताना दिसत आहे. ज्यामध्ये दोन्ही गाड्यांचा चक्काचूर होऊन मोठे नुकसान झाले. व्हिडिओमध्ये दोन गाड्यांसमोर आणखी एक मोठा दगड एका कारला आदळताना दिसत आहे. कारने डाव्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली. रस्त्यावर उभी असलेली वाहने कोहिमा येथून येत होती. हा अपघात त्यांच्या पाठीमागील वाहनाच्या कॅमेऱ्यात कैद झाला. (हेही वाचा, Odisha Train Accident: ओडिशातील बालासोर रेल्वे अपघाताची CRS चौकशी पूर्ण; अहवालात समोर आली धक्कादायक माहिती, जाणून घ्या सविस्तर)
ट्विट
#WATCH | A massive rock smashed a car leaving two people dead and three seriously injured in Dimapur's Chumoukedima, Nagaland, earlier today
(Viral video confirmed by police) pic.twitter.com/0rVUYZLZFN
— ANI (@ANI) July 4, 2023
दरम्यान, जखमींवर दिमापूर येथील रेफरल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, एक व्यक्ती अद्याप एका कारमध्ये अडकली होती. थोड्या वेळाने त्याला बाहेर काढण्यातआले. पीटीआय वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे.