Representative Image (photo credit- File image)

सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने आयकर विभागाच्या (Income Tax) नऊ डिफॉल्टर्सची (Defaulters) यादी जारी केली आहे, ज्यामध्ये थकबाकी असलेल्या परंतु बेपत्ता झालेल्या कंपन्या आणि व्यक्तींचा समावेश आहे. सेबीच्या वसुली अधिकार्‍यांनी या थकबाकीदारांना डिमांड नोटीस बजावण्याचा प्रयत्न केला तेव्हा ही बाब उघडकीस आली. यांच्या विरोधात वसुली प्रमाणपत्रे तयार केली होती.

काही थकबाकीदार हे बाजार नियामकाकडे उपलब्ध असलेल्या एक किंवा अधिक पत्त्यांवरून गेल्या जवळपास दोन वर्षांपासून बेपत्ता आहेत आणि काही गेल्या दोन आठवड्यांपासून बेपत्ता आहेत. त्यापैकी MYNK1906 इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड आहे, ज्याचे तीन ज्ञात पत्ते आहेत. यातील एक विलेपार्ले आणि दोन दक्षिण मुंबईत आहेत व या तीनही पत्त्यांवरून कंपनी गायब आहे. Inducon India Limited चे दोन्हीही पत्ते 27 एप्रिल 2021 पासून गायब आहेत. गोरेगाव उपनगरात दोन पत्ते असलेली क्लासिक प्रेस इंटरनॅशनल लिमिटेड कंपनी 17 जून 2021 पासून गायब आहे.

19 जुलै 2022 पासून बेपत्ता असलेल्या इतर तीन जणांमध्ये विलेपार्ले पूर्व येथील गुडअर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड, कांदिवली येथील तीन पत्त्यांवरून आणि आणि नरिमन पॉइंट येथील 3 ठिकाणांवरून कार्यरत असलेली एकी इन्फोकॉम लिमिटेड, सांताक्रूझ येथील एकमेव पत्त्यावरून कार्यरत असलेली तेजुमल इंडस्ट्रीज लिमिटेड यांचा समावेश आहे.

26 जुलै 2022 पासून अंधेरी पूर्व येथील दोन ठिकाणांहून कार्यरत राजेंद्र मायनिंग स्पेअर्स लिमिटेड कंपनी गायब आहे. ग्लोरिया लीजिंग लिमिटेड जी दक्षिण मुंबई आणि रायगडमधील कर्जत येथून कार्यरत होती, ती 29 सप्टेंबर 2022 पासून उपलब्ध नाही. डायनाव्हॉक्स इंडस्ट्रीज लिमिटेड 6 डिसेंबर 2022 पासून बेपत्ता झाली आहे. (हेही वाचा: भारतीय रेल्वेचा डेटा लीक झाल्याचा दावा; 3 कोटी वापरकर्त्यांची माहिती ऑनलाइन विक्रीसाठी उपलब्ध)

सेबीने ही यादी जाहीर केल्यानंतर, ट्रेड युनियन्स जॉइंट अॅक्शन कमिटीचे (TUJAC) निमंत्रक आणि बँकिंग तज्ज्ञ विश्वास उटगी म्हणाले की, या संस्था आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्ती अचानक रडारवरून कशा गायब झाल्या ही गंभीर चिंतेची बाब आहे आणि त्याची चौकशी व्हायला हवी. या कंपन्या त्यांची थकबाकी आणि विविध सरकारी कर भरण्यास जबाबदार आहेत, मात्र त्यांनी तसे केले नाही तर या थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करून विकण्याची वेळ येईल. आता सेबीने या थकबाकीदारांना 12 जानेवारी 2023 पर्यंत एका पंधरवड्यात पत्र किंवा ईमेलद्वारे वसुली अधिकारी सृष्टी आंबोकर यांच्याशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला आहे.