Heatwave | Image used for representational purpose (Photo Credits: Pixabay)

Heatwave Guidelines: वाढते तापमान यंदाचा उन्हाळा काहीसा अधिक कडक असणार असे संकेत देते आहे. भारतीय हवामान विभागानेही नुकतेच त्याबाबत सुतोवाच केले. तसेच, यंदा उष्णतेची लाट (Heatwaves) निर्माण होण्याची शक्यता वर्तवली. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयही (Ministry of Health) सावध झाले आहे. उन्हामुळे उद्भवणाऱ्या आरोग्याच्या तक्रारी, आजार आणि उष्माघात यांसारख्या बाबींपासून नागरिकांनी स्वत:ला दूर ठेवावे, यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. आरोग्य मंत्री, डॉ. मनसुख मांडविय (Mansukh Mandaviya) यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत, उष्णतेशी संबंधित आजारांचा सामना करण्यासाठी आणि सर्वसमावेशक कृती आराखडा तयार करण्यासाठी मुख्य धोरणांवर चर्चा करण्यात आली.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने X (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट केलेल्या निवेदनात, बैठकीच्या निकालांची रूपरेषा सांगितली, ज्यात राज्यमंत्री (आरोग्य) डॉ. भारती प्रवीण पवार, नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही के पॉल यांच्यासह सचिव (आरोग्य) श्री अपूर्व चंद्रा आणि इतर मान्यवर. उपस्थित होते. उष्णतेची लाट आलीच तर त्यासाठी तोंड देण्यासाठी सज्जतेच्या पातळीचे मूल्यांकन करणे आणि आगामी उन्हाळी हंगामासाठी धोरणे तयार करणे हे या बैठकीचे प्रमुख उद्दीष्ट होते. (हेही वाचा, Summer Weather Updates: यंदा नेहमीपेक्षा कडक उन्हाळा, संपूर्ण भारतात उष्णतेची लाट संभव- हवामान विभाग)

आरोग्य मंत्रालयाकडून जारी मार्गदर्शक तत्त्वे

काय करावे

  • हायड्रेटेड राहा
  • थेट सूर्यप्रकाश टाला (कडक उन्हात जाणे टाळा)
  • सावलीत राहा
  • दुपारी 12 ते 4 या वेळेत घरीच थांबा

काय करू नये

  • दुपारी 12 ते 4 या वेळेत गरज नसेल तर घराबाहेर पडणे टाळा
  • तीव्र उन्हात काम करु नका, टाळा
  • दुपारी 2 ते 4 या वेळेत स्वयंपाक करणे टाळावे
  • लहान मुले आणि पाळीव प्राण्यांना वाहनात सोडू नका
  • अल्कोहोल, चहा, कॉफी, साखरयुक्त पेये आणि फिजी पेये टाळा
  • अनवाणी चालु नका
  • दररोज एकटे राहणाऱ्या वृद्ध किंवा आजारी लोकांच्या आरोग्याचे निरीक्षण करा
  • तुमचे घर थंड ठेवा, पडदे, शटर किंवा सनशेड वापरा आणि रात्री खिडक्या उघडा
  • दिवसा खालच्या मजल्यावर राहण्याचा प्रयत्न करा
  • शरीर थंड होण्यासाठी पंखा आणि ओलसर कपडे वापरा

एक्स पोस्ट

डॉ. मनसुख मांडविया यांनी उष्णतेशी संबंधित आव्हानांचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यासाठी लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याच्या महत्त्वावर भर दिला. उष्णतेच्या लाटेचे प्रतिकूल परिणाम कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांचा वेळेवर प्रसार करण्याच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला. आरोग्यमंत्र्यांनी उष्णतेशी संबंधित आजारांची तीव्रता कमी करण्यासाठी जनजागृती मोहिमेची भूमिका अधोरेखित केली.

व्हिडिओ

आरोग्य मंत्रालयाने उन्हाळ्याच्या महिन्यांत जनतेसाठी सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली आहेत. उष्णतेशी संबंधित जोखमींपासून व्यक्ती स्वतःचे संरक्षण करू शकतील याची खात्री करण्यासाठी या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये काय करावे आणि करू नये यांचा समावेश आहे. शिफारशींमध्ये हायड्रेटेड राहणे, दुपारच्या वेळी घराबाहेर जाणे-शेतीची कामे टाळणे आणि लहान मुले आणि पाळीव प्राण्यांना तीव्र उन्हापासून सुरक्षीत ठिकाणी ठेवणे यांसारख्या बाबींवर भर देण्यात आला आहे.