Visa | Representational Image | (Photo Credits: PTI)

कोरोना वायरस प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भारतामध्ये परदेशी नागरिकांच्या व्हिसावरील निर्बंध आता उठवण्यात आले आहेत. तातडीने सध्या पुन्हा व्हिसा मंजुरीचे काम सुरू केले जाईल असे सांगण्यात आलेआहे. मात्र यामध्ये अद्यापही परदेशी नागरिकांना टुरिस्ट व्हिसा दिला जाणार नाही. तसेच इलेक्ट्रॉनिक आणि मेडिकल कॅटेगरीमधील व्हिसा देखील स्थगित ठेवले जातील. 8 महिन्यांनंतर आता व्हिसा प्रक्रिया पुन्हा सुरळीत होण्यास गती आली आहे. दरम्यान The Ministry of Home Affairs (MHA) ने दिलेल्या माहितीनुसार, Overseas Citizen of India (OCI) आणि Person of Indian Origin कार्ड होल्डर्सदेखील आता भारतामध्ये परतण्यासाठी व्हिसा अर्ज दाखल करू शकतात. Hong Kong कडून एअर इंडिया, विस्तारा फ्लाइट्सच्या उड्डाणावर येत्या 30 ऑक्टोंबर पर्यंत बंदी, प्रवासी COVID19 पॉझिटिव्ह आल्याने घेतला निर्णय.

परदेशी नागरिक देखील टुरिस्ट व्हिसा वगळता इतर कारणांसाठी भारतामध्ये येऊ शकतात. कोरोनाची स्थिती पाहता मार्च 2020 पासून परदेशी तसेच भारतीय नागरिकांच्या आंतरराष्ट्रीय प्रवासावर निर्बंध होती. मात्र आता हळूहळू कोरोनाची स्थिती नियंत्रणामध्ये येत असल्याचं चित्र असताना परदेशी आणि भारतीय नागरिकांचे प्रवास पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. मात्र अद्याप भारतीय आणि परदेशी नागरिकांना भारतात Electronic visa, tourist visa and medical visa मिळवण्यासाठी थोडी प्रतिक्षा करावी लागणार आहे.

जर एखाद्या व्यक्तीचा व्हिसा संपत असेल तर त्यासाठी नवा अर्ज करून माहिती देणं गरजेचे आहे. इंडियन कमिशनकडून योग्य कॅटेगरीमधील व्हिसा उपलब्ध करून दिला जाईल. तसेच उपचारांसाठी भारतात यायचे असल्यास मेडिकल अटॅचमेंट सह नव्याने अर्ज दाखल करावा लागेल.

OCI and PIO cardholdersदेखील आता भारतामध्ये येऊ शकतात, त्यांच्या इमिग्रेशनची तपासणी संबंधित चेक पोस्ट वर केली जाणार आहे. परदेशातून अनेक जण शिक्षण, रिसर्च, वैद्यकीय मदत, व्यापार यासाठीदेखील येतात. त्यांचेदेखील मार्ग खुले आहेत.

दरम्यान अद्याप आंतरराष्ट्रीय विमानसेवा पूर्ववत झालेली नसली तरीही कमर्शिअल फ्लाईट्स, वंदे भारत अंतर्गत देशात येणारी विमानं आणि एअर बबल द्वारे सुरू केलेली सेवा यांच्याद्वारे प्रवासी येऊ शकतात.