AAP Leaders and Delhi CM Arvind Kejriwal. (Photo Credits: ANI)

दिल्ली महानगरपालिका (MCD Election) निवडणुकीत आम आदमी पक्षाला (AAP ) घवघवीत यश (MCD Election Result 2022) मिळाले. भारतीय जनता पक्षाची 15 वर्षांची सत्ता उधळून लावत दिल्लीच्या जनतेने महापालिकेच्या चाव्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या पक्षाच्या हातात दिल्या. या दणदणीत विजयानंतर आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी प्रतिक्रियाही तितकीच संयत दिली आहे. अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या जनतेचे आभार मानत परीवर्तनाबद्दल धन्यवाद दिले. अरविंद केजरीवाल यांनी म्हटले की, आजवर जनतेने आम्हाला शाळा, रुग्णालये आणि वीज यांसाठी सत्ता दिली होती. आता जनतेने दिल्लीच्या स्वच्छतेसाठी सत्ता दिली आरे. आता आम्ही दिल्ली स्वच्छ ठेऊ तसे सर्व पार्कही छान ठेऊ.

विजयाने उत्साहीत झालेल्या पक्षकार्यकर्त्यांपुढे अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या भाषणात सर्व पक्षांच्या विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. आता राजकारण थांबवूया.. सर्वांनी एकत्र येऊया असे म्हणत सर्वपक्षियांसह दिल्लीकरांनाही साद घातली. आता आपल्याला दिल्ली ठिक करायची आहे. त्यासाठी भाजप आणि काँग्रेसचेही योगदान अपेक्षीत आहे. आम्हाला केंद्र सरकारचेही योगदान हवे. पंतप्रधानांनी दिल्ली निटनेटकी करण्यासाठी आशीर्वाद द्यावेत, असेही केजरीवाल म्हणाले. विजयी झालेले 250 नगरसेवक हे कोणत्याही पक्षाचे नाहीत. ते दिल्लीचे नगरसेवक असल्याचेही ते म्हणाले. (हेही वाचा, MCD Election Result 2022: विजय 'आप'लाच, 'झाडू ने केली कमाल, भाजपच्या कमळाचा पत्ता कट; काँग्रेसचा नाही हालला 'हात')

ट्विट

केजरीवाल यांनी पुढे म्हटले की, आता आम्ही दोन कोटी लोक मिळून दिल्ली स्वच्छ करु. आता आम्हाला दिल्ली सरकारने केला त्याच पद्धतीने महापालिकेतील भ्रष्टाचार दूर करायचा आहे. लोक म्हणतात की आपल्याला काम करतो त्याची मत मिळत नाहीत. मतं मागण्यासाठी गल्लीबोळात जावे लागते. आम्हाला हे करायचे नाही. आपल्याला नकारात्मक राजकारण करायचे नाही. आज देशाच्या जनतेने देशाला संदेश दिला आहे. आम्हाला शाळा, महाविद्याले आणि रुग्णालयांमुळेही मतं मिळाली आहेत. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी या वेळी कार्यकर्त्यांना अहंकार करु नका, सत्ता योग्य पद्धतीने राबवा असेही म्हटले.