अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या आम आदमी पक्षाला (AAP) सन 2022 हे सरते साल फलदायी ठरले आहे. दिल्ली महानगरपालिका निवडणूक (MCD Election) 2022 मध्ये आम आदमी पक्ष (Aam Aadmi Party) जोरदार मुसंडी मारत सत्तेवर आला आहे. आम आदमी पार्टीने बहुमताचा आकडा गाठल्याने भारतीय जनता पक्षाचा (BJP) पराभव झाला असून, 15 वर्षांची सत्ता संपुष्टात आली आहे. दरम्यान, या निवडणुकीत काँग्रेसला मात्र अस्तित्वाची लढाई करावी लागली. आम आदमी पक्षाने दिल्लील भाजपला दणका देत 132 जागा जिंकल्या. 132 जागा जिंकून आप पहिल्या, 97 जागा जिंकत भाजप दुसऱ्या तर केवळ 06 जागा जिंकत कँग्रेस तिसऱ्या स्थानावर आहे. तीन जागांवर अपक्ष निवडून आले आहेत.
आम आदमी पक्षाने नेत्रदीपक विजय प्राप्त केल्यानंतर दिल्लीचे उपमुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मनीष सिसोदिया यांनी हिंदीत ट्विट केले. त्याचा मराठी भावानुवाद पुढीलप्रमाणे, 'दिल्ली MCD मध्ये आम आदमी पक्षावर विश्वास दाखविल्याबद्दल दिल्लीतील नागरिकांचे आभार. . जगातील सर्वात मोठ्या पक्षाला पराभूत करुन दिल्लीच्या जनतेने कट्टर प्रामाणीक आणि काम करणाऱ्या अरविंद केजरीवाल यांना विजयी केले आहे. आमच्यासाठी हा विजय खूप मोठी बाब आहे.' (हेही वाचा, MCD Election Result 2022: भाजपच्या सत्तेला सुरुंग, आम आदमी पार्टीची विजयी वाटचाल, 126 जागांवर आघाडी)
दिल्लीतील विजयानंतर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मह्टले की, आम आदमी पर्टीने आगोदर दिल्लीतून काँग्रेसची सत्ता 15 वर्षांपूर्वी काढून घेतली. आता एमसीडीमध्ये भाजपची 15 वर्षांची सत्ता काढून घेतली. याचा अर्थ नकारात्मक राजकारणाला लोक कंटाळले आहे. नकारात्मक राजकारण लोक स्वीकारत नाहीत. लोकांना वीज, पाणी, स्वच्छता, व्यवस्थापन हवे आहे.
ट्विट
जिन्होंने वोट दिया उनका शुक्रिया, जिन्होंने नहीं दिया उनका काम सबसे पहले करेंगे - #ArvindKejriwal #MCDResults #AAP
— Abdulkadir/ अब्दुलकादिर (@KadirBhaiLY) December 7, 2022
दिल्ली भाजप अध्यक्ष आदेश गुप्ता यांनी म्हटले की, आम्ही आम आदमी पक्षाचा भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला. तो जनतेने स्वीकारला. आम्ही महापालिकेत चौथ्यांदा महापौर बनवू. ज्या पद्धतीचे कल येत आहेत. त्यावरुन लक्षात येते की भाजप संपूर्ण बहुमताने सत्ता मिळवेल. आदेश गुप्ता यांनी प्रतिक्रिया दिली खरी. परंतू, त्यात तथ्य नव्हते. दिल्लीत भाजपने विजय मिळवला. भाजपचा बुरुज ढासळला.