मध्य प्रदेशात एका नव्या नवरीने लग्नाच्या पहिल्याच रात्री सासरच्या मंडळींना लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तीन जणांना सुद्धा अटक केली असून त्यांच्याकडून 25 हजार रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. मात्र सासरच्या मंडळींना लुटणाऱ्या नववधूने पळ काढला आहे. पोलिसांकडून महिलेचा शोध घेतला जात असल्याचे सांगण्यात आले आहे. विक्की नावाच्या तरुणासोबत आरती नावाच्या मुलीचे लग्न झाले. वराच्या मंडळींचा असा आरोप आहे की, वधूच्या घरातील मंडळींना 1 लाख रुपये घेऊन लग्न लावले आहे. तर लग्नाच्या पहिल्या रात्रीच आरती हिने सासऱ्यांना उल्लू बनवले आहे.
आरती हिने लग्नाच्या पहिल्या रात्रीच तीन मित्रांसोबत पळ काढला. या प्रकरणी सासरच्या मंडळींना समजले असता त्यांना आपली फसवणूक झाल्याचे कळले. यावर त्यांनी तातडीने पोलिसात धाव घेतली. तसेच आरोपी महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिचा तपास केला जात आहे. महिलेच्या परिवाराने 1 लाख रुपये नवऱ्याच्या घरातील मंडळींकडून घेऊन मुलीचे लग्न लावून दिल्याचे ही त्यांनी पोलिसांना सांगितले आहे.(पोलिसांनी केला बाळ चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, तिघांना अटक)
आरोपी महिला आणि तिचे साथीदार यांच्यासारखे अन्य जण सुद्धा लोकांना लग्नाच्या नावाखाली लूटतात. सध्या पोलिसात गुन्हा दाखल केला असून तपास केला जात आहे. तर अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींना तुरुंगाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. लवकरच आरोपींना न्यायालयात सुद्धा हजर केले जाणार आहे.