High Court On Physical Intimacy: शरीरसंबंध नाकारणे वैहाहिक जीवनात क्रुरताच! घटस्फोटासाठी वैध कारण, हायकोर्टाचे मत
विवाह पूर्ण करण्यास नकार देणे आणि शारीरिक जवळीक नाकारणे (,Denying Physical Intimacy In Marriage) ही घटस्फोटासाठी वैध कारणे आहेत, असे मत या वेळी न्यायमूर्ती शील नागू आणि न्यायमूर्ती विनय सराफ यांच्या खंडपीठाने निकालादरम्यान व्यक्त केले.
मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने (Madhya Pradesh High Court) एका महत्त्वपूर्ण निर्णयात, मानसिक क्रूरतेच्या आधारावर घटस्फोट (Divorce) मंजूर केला आहे. विवाह पूर्ण करण्यास नकार देणे आणि शारीरिक जवळीक नाकारणे (,Denying Physical Intimacy In Marriage) ही घटस्फोटासाठी वैध कारणे आहेत, असे मत या वेळी न्यायमूर्ती शील नागू आणि न्यायमूर्ती विनय सराफ यांच्या खंडपीठाने निकालादरम्यान व्यक्त केले. हा निर्णय तीन जानेवारी रोजी आला. या प्रकरणात एका पुरुषाने आपल्या पत्नीविरोधात घटस्फोटाची मागणी कोर्टात केली होती. या वेळी याचिकाकर्त्या पतीने केलेला दावा कोर्टाने मान्य करत घटस्फोट मंजूर केला.
शरीरसंबंधास पूर्ण नकार
खटल्यादरम्यान पुढे आलेल्या माहितीनुसार, याचिकाकर्ता पुरुष आणि त्याची पत्नी असलेली महिला यांचा विवाह जैलै 2006 मध्ये झाला होता. मात्र, विवाह होऊनही पत्नीने तो सातत्याने नाकारला. तसेच, पतीला शारीरिक जवळीक आणि लैंगिक शरीरसंबंध पूर्णपणे नाकारले होते. पत्नीने विवाह झाल्याचे सातत्याने नाकारत म्हटले होते की, आपले जबरदस्तीने लग्न लावले आहे. त्यामुळे आपले जोडीदारावर प्रेम नाही. त्यामुळे जोडीदाराने दुसऱ्या कोणासोबतही अशा प्रकारचे संबंध ठेवावेत. विवाह म्हणून मी हे संबंध ठेवणार नाही. (हेही वाचा, HC On Wife Refusal Of Sex: 'पत्नीने पतीसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास नकार देणे ही क्रूरता', उच्च न्यायालयाने मंजूर केला घटस्फोट)
कौटुंबिक न्यायालयाने फेटाळली याचिकाकर्त्याची याचिका
पत्नीच्या टोकदार विरोधानंतर सदर व्यक्ती (पती) अमेरिकेस निघून गेला. दरम्यान, तरीही पत्नीने पतीच्या कुटुंबासोबत राहणे नापसंत केले. ती पतीच्या कुटुंबाकडे म्हणजेच सासरी राहावयास आली नाही. दरम्यान, पतीनेही 2011 मध्ये भोपाळ येथील कौटुंबीक न्यायालयात घटस्फोटासाठी कायदेशीर कार्यवाही केली. मात्र, कौटुंबिक न्यायालयाने याचिकाकर्त्याची याचिका फेटाळली. त्यानंतर सदर व्यक्तीने 2014 मध्ये कौटुंबीक न्यायालयात आपील दाखल केले. उच्च न्यायालयाने पतीचा दावा मान्य करत आपल्या आदेशात म्हटले की, वैध कारणाशिवाय किंवा शारीरिक असक्षमतेशिवाय लैंगिक संबंध ठेवण्यास एकतर्फी नकार देणे ही मानसिक क्रूरता ठरते. खंडपीठाने तो भारतात असताना विवाह पूर्ण करण्याची पुरुषाची आशा मान्य केली परंतु पत्नीने शारीरिक जवळीकांना सातत्याने नकार दिल्यावर प्रकाश टाकला. (हेही वाचा, Sexual Relationship Out Of Love: 'लैंगिक संबंध प्रेमाचे होते, वासनेचे नव्हते’; अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल असलेल्या तरुणाला जामीन मंजूर)
कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय रद्द करून, उच्च न्यायालयाने म्हटले की, कनिष्ठ न्यायालयाने चुकीचा निष्कर्ष काढला की पत्नीने विवाह पूर्ण न करणे हे घटस्फोटाचे कारण असू शकत नाही. विवाहाच्या आजूबाजूची परिस्थिती आणि वैवाहिक संबंध ठेवण्यास तिचा सततचा नकार लक्षात घेता पत्नीने केलेले कृत्य मानसिक क्रूरतेचे आहे. घटस्फोटासाठी वैध कारण म्हणून शारीरिक जवळीक नाकारणे हे मान्य करण्याचा, विभक्त होऊ पाहणाऱ्या जोडीदाराच्या मानसिक आरोग्यावर अशा कृतींचा परिणाम लक्षात घेऊन हा निर्णय एक उदाहरण प्रस्थापित करतो.
(The above story first appeared on LatestLY on Jan 16, 2024 04:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

