Madhya Pradesh: फोनवर मुलांशी बोलत असल्याने 2 तरुणीला अमानुषपणे मारहाण, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरोपींना अटक
Arrest | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Madhya Pradesh:  मध्य प्रदेशातील आदिवासी परिसरात महिला आणि तरुणींसोबत दुष्कर्म केले जात असल्याचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. धार जिल्ह्यात नातेवाईकांनी दोन तरुणींना बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला. या तरुणी मुलांशी फोनवर बोलत असल्याच्या कारणास्तव त्यांना अमानुषपणे मारहाण केली गेली. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणी कारवाई करत 7 जणांना अटक केली आहे.(Tamil Nadu: फेसबूक, व्हाट्सअपवर राहायची सतत ऑनलाईन, संतापलेल्या भावाने केली बहिणीची हत्या)

अलीराजापुर मधील एका तरुणीसोबत झालेला प्रकार शांत होत नाही तोवर धार जिल्ह्यातील पीपलवा गावातील एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओ असे दिसून येते की, दोन तरुणींना काही जण जबरदस्त मारहाण करत आहेत. त्यांना काठी-लाठ्यांनी मारले जात आहे. जसे की एखाद्या जनावरांसोबत वागणूक केली जाते.

ऐवढेच नाही तर तरुणींना मारहाण केल्याचा व्हिडिओ सुद्धा मोबाईमध्ये रेकॉर्ड करण्यात आला. पण काही महिलांनी सुद्धा तरुणींना दगड आणि लाथाबुख्यांनी मारले. तरुणी त्यांच्या मामाच्या मुलासोबत फोनवर बोलायच्या याच कारणामुळे त्यांना मारहाण केल्याचे सांगण्यात आले आहे.(धक्कादायक! हुंडा मिळाला नाही म्हणून पतीने नवविवाहितेवर करवला मित्रांकडून सामुहिक बलात्कार; गुप्तांगाला मिरची व बाम लावून केले बेशुद्ध)

ही घटना 22 जून रोजीची असल्याची सांगितली जात असून पोलिसांना हा व्हिडिओ 25 जून रोजी मिळाला. तरुणी खुप घाबरल्या होत्या. पण पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवून सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. तर काही दिवसांपूर्वीच अशाच प्रकारची घटना अलीराजापुर येथून समोर आली होती. येथील तरुणीसोबत तिच्या वडिलांसह भावाने तिला झाडाला बांधून मारले होते. त्यामुळे ती बेशुद्ध पडली. तिची चुक ऐवढीच होती की, आपल्या नातेवाईकांकडे गेली होती.