सोशल मीडियाचा (Social Media) अतिवापर करणाऱ्या बहिणीची तिच्याच सख्या भावाने हत्या (Murder) केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना तामिळनाडू (Tamil Nadu) येथे 29 जून रोजी घडली आहे. याप्रकरणी 24 वर्षीय तरूणाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. मृत मुलीने नुकतीच बारावीची परीक्षा पास केल्याचे सांगितले जात आहे. परंतु, तिचे सतत फेसबूक, व्हाट्सअप आणि शेअरचॅट वापरणे आरोपीला खटकत होते. यातूनच ही हत्या झाल्याचे चौकशीतून समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कविता (वय, 17) असे मृत मुलीजे नाव आहे. ती तामिळनाडूच्या थुथुकुडी जिल्ह्यातील वल्लनाडूजवळील वसवअप्पपुरम परिसरात वास्तव्यास होती. कविताने नुकतीच बारावीची परीक्षा पास केली आहे. परंतु, कविता ही लॉकडाऊनपासून आपल्या मोबाईलवर गेम्स खेळण्यात आणि फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि शेअरचॅट सारख्या सोशल प्लॅटफॉर्मचा अतिवापर करायची. याचा कविताचा भाऊ मलायराजाला राग येत होता. यावरून मलायराजा आणि कविता यांच्यात अनेकदा वाद झाला होता. परंतु, तरीही कविताने सोशल मीडियावर वापरणे थांबवले नाही. यामुळे राग अनावर झालेल्या मलायराजाने कविताची हत्या केली आहे. हे देखील वाचा- Madhya Pradesh: मध्य प्रदेशात चक्क रस्ताच गेला चोरीला, ग्रामस्थांकडून पोलिसांत तक्रार दाखल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 जून रोजी मलायराजा दारू पिऊन घरी आला होता. त्यावेळी कविता मोबाईलद्वारे आपल्या मित्रांशी गप्पा मारत असल्याचे मलायराजाने पाहिले. त्यानंतर त्याने कविताशी भांडण करून तिचा मोबाईल फोडण्याचा प्रयत्न केला. याचदरम्यान, कविताच्या गळ्याला तीव्र जखम झाली आणि ज्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला आहे.