PM Modi (फोटो सौजन्य - ANI)

Lymphatic Filariasis Disease: लिम्फॅटिक फायलेरियासिस या दुर्बल आजाराने देशात शिरकाव केला आहे. लिम्फॅटिक फिलेरियासिस (एलएफ), ज्याला सामान्यतः एलिफॅन्टियासिस देखील म्हणतात, हा एक गंभीर संसर्गजन्य रोग आहे जो प्रामुख्याने लिम्फॅटिकवर प्रभावित करतो. हा रोग फिलेरियासिस नावाच्या परजीवीमुळे होतो, जो डासांद्वारे मानवांमध्ये पसरतो. केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी सोमवारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लिम्फॅटिक फिलेरियासिस निर्मूलन मोहिमेवर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री  नड्डा यांनी  मोहिमेअंतर्गत आज 13 राज्यांमध्ये लिम्फॅटिक फिलेरियासिस निर्मूलनासाठी राष्ट्रीय जन औषध प्रशासन (एमडीए) फेरी सुरू केली.  लिम्फॅटिक फिलेरियासिस (LF) चा प्रसार थांबवण्यासाठी राष्ट्रव्यापी मास ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन (MDA) मोहिमेची सुरुवात राज्यांचे आरोग्य मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये झाला असून  व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा झाली आहे. देशात वाढत चाललेल्या लिम्फॅटिक फायलेरियासिस या दुर्बल आजाराला रोखण्यासाठी मोदी सरकारने हा मोठा उपक्रम सुरू केला आहे. या आजाराबाबत, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे म्हणणे आहे की, या उपक्रमाचे उद्दिष्ट लाखो लोकांना या आजारापासून वाचवणे हा आहे. हेही वाचा: Devendra Fadnavis meet Raj Thackeray: राज ठाकरे यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवतीर्थवर दाखल, BMC निवणुकीसाठी जुगाड? राजकीय वर्तुळाच चर्चा

नॅशनल फिलेरिया एलिमिनेशन प्रोग्राम (NPEP) अंतर्गत, 2030 पर्यंत भारतातून हा रोग पूर्णपणे नष्ट करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. या उपक्रमांतर्गत विविध शासकीय व निमसरकारी संस्थांच्या सहकार्याने मोफत औषधांचे वाटप व डास नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. तसेच, जनजागृती करण्यासाठी देशभरात विविध मोहिमा आणि कार्यक्रम राबविण्यात येत आहेत, जेणेकरून लोकांना या आजाराविषयी अधिक माहिती मिळावी आणि डासांपासून बचाव करण्यासाठी उपाययोजना अवलंबल्या जातील.

लिम्फॅटिक फिलेरियासिसची कारणे

लिम्फॅटिक फिलेरियासिस फिलेरियासिस नावाच्या परजीवीमुळे होतो, ज्याचे प्रामुख्याने तीन प्रकार आहेत:

1- वुचेरेरिया बैनक्रॉफ्टी

2- ब्रुगिया मलयि

3- ब्रुगिया तिमोरी

जेव्हा संक्रमित डास एखाद्या व्यक्तीला चावतात तेव्हा हे परजीवी डासांच्या माध्यमातून मानवांमध्ये संसर्ग पसरवतात. या परजीवींच्या संसर्गामुळे शरीरातील लिम्फॅटिक प्रणालीच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो.

 शरीराच्या अवयवांना सूज येणे, शरीराचे अवयव आकाराने वाढतात ज्याला हत्तीरोग म्हणतात. या आजारावर योग्य उपचार न केल्यास, यामुळे अपंगत्व येऊ शकते. लिम्फॅटिक फिलेरियासिस हा एक गंभीर आणि दुर्बल रोग आहे, परंतु त्यावर उपचार आणि प्रतिबंध करण्यासाठी योग्य पावले उचलली जाऊ शकतात. मोदी सरकारचा हा उपक्रम भारताला या आजारापासून मुक्त करण्याच्या दिशेने निश्चितच महत्त्वाचे पाऊल ठरू शकतो.