![](https://mrst1.latestly.com/uploads/images/2025/02/devendra-fadnavis-raj-thackeray-ac.jpg?width=380&height=214)
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भेटीसाठी त्यांचे निवासस्थान शिवतीर्थ येथे पोहोचले आहेत. या भेटीचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नसले तरी, आगामी मुंबई महापालिका निवडणूक 2025 (BMC Election 2025) च्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. आगामी महापालिका निवडणुकीत महायुती सरकारचा घटक पक्ष असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षावर दबाव टाकण्यासाठी भाजपची ही खेळी तर नाही ना? अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
बीएमसी निवडणूक केंद्रस्थानी?
मुंबई महापालिका निवडणूक आणि एकूणच राजकीय स्थितीचा विचार करता शिवसाना हा पक्ष महत्त्वाचा घटक ठरतो. अर्थात मूळ शिवसेनेमध्ये फूट पडून उद्धव ठाकरे यांचा आणि एकनाथ शिंदे यांचा गट वेगळा झाला असला तरीसुद्धा दोन्ही गटांची ताकद या शहरात मजबूत आहे. या पार्श्वभूमीवर बीएमसी इलेक्शनमध्ये जागावाटपात एकनाथ शिंदे यांचा पक्ष अधिक जागा मागण्याचा किंवा भाजपवर दबाव टाकण्याची खेळी करु शकतो. त्यामुळे जर राज ठाकरे यांचा मनसे पक्ष सोबत असेल तर शिंदे यांची बार्गेनिंग पॉवर कमी होऊ शकते, असाही भाजप नेतृत्व विचार आणि शक्यतांची चाचपणी करु शकते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचे शिवतीर्थ येथे जाणे वेगवेगळे राजकीय अर्थ निर्माण करत आहे. (हेही वाचा, Devendra Fadnavis Meet Raj Thackeray: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची घेतली भेट, दोघांमध्ये तासभर चर्चा)
दरम्यान, नेटवर्क 18 ने दिलेल्या वृत्तानुसार, भाजप नेते आणि फडणवीस यांचे अत्यंत विश्वासून मानले जाणारे मोहीत कंबोज हे देखील आगोदरच या भेटीसाठी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. ही भेट पूर्वनियोजीत नव्हती. त्यामुळे अशी कोणती परिस्थिती निर्माण झाली की, मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे यांच्या भेटीसाठी अचानक जावे, असा सवाल उपस्थित केला जातो आहे. (हेही वाचा, Mumbai MNS Melava: मुंबई मध्ये मनसे चा मेळावा संपन्न; विधानसभा निवडणूकीतील पराभवानंतर पहिल्यांदा जाहीर बोलताना राज ठाकरे यांचा 'भाजपा' वर हल्लाबोल)
भेटीचे कारण गुलदस्त्यात
Maharashtra CM Devendra Fadnavis visits MNS's party' s chief Raj Thackeray 'Shivteerth' at Dadar in central Mumbai., meeting triggers speculation ahead of BMC polls.
# fadnavis#raj Thackeray #BMC polll
— Sapna Desai1602 (@Sapnaaaaaa) February 10, 2025
EVM वरील टिकेनंतर भेटीमुळे चर्चांना उधान
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचा कार्यकर्ता मेळावा नुकताच पार पडला. या मेळाव्यात राज ठाकरे यांनी लोकसभा आणि त्यानंतर अल्पावधीतच झालेल्या विधानसभा निवडणूक 2024 वर जोरदार भाष्य केले होते. त्यांनी महायुती सरकारचा विजय हा जनतेचा नसून ईव्हीएमचा विजय असल्याचेच स्पष्टपणे सांगीतले होते. इव्हीएम विजयावरुन केलेल्या वक्तव्यावर भाजप आणि महायुतीतील अनेक नेत्यांनी तीव्र शब्दांमध्ये प्रतिक्रियाही दिल्या होत्या. त्यामुळे आता या भेटीकडे वेगवेगळ्या अंगाने पाहिले जात आहे. दुसरे असेल की, राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे माहिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक मैदानात होते. या वेळी भाजपने अमित ठाकरे यांना जाहीर पाठिंबा दिला होता. नंतर तो युतीधर्म पाळण्याासाठी शिंदे यांच्या उमेदवारास देण्यात आला. मात्र, त्याची परिणीती शिंदे यांचा उमेदवार सदा सरवणकर यांचा पराभव होण्यात झाली. त्यामुळे आगामी राजकारण कसे वळण घेते याबाबतही उत्सुकता आहे.