Elections (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

भारतीय निवडणूक आयोग (Election Commission Of India) द्वारा आज 17 व्या लोकसभेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर (Lok Sabha Elections 2024 Schedule) करण्यात आला. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच देशभरात आदर्श आचारसंहिता (Model Code of Conduct) लागू झाली आहे. त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी तंबी देत आयोगाने मतदानाच्या तारखाही जाहीर केल्या. त्यानुसार देशभरामध्ये एकूण 7 टप्प्यांमध्ये मतदान पार पडेल. देशभरातील सर्व ठिकाणचे मतदान झाल्यानंतर सर्व मतदानाची मतमोजणी 4 जून रोजी एकाच दिवशी होईल. ही मतमोजणी या दिवशी पार पडेल आणि देशाला नवे सरकार मिळेल.

लोकसभेच्या एकूण 543 जागांसाठी एकूण 7 टप्प्यांमध्ये मतदान, जाणून घ्या टप्पे

पहिला टप्पा- 19 एप्रिल रोजी मतदान

दुसरा टप्पा- 26 एप्रिल

तिसरा टप्पा- 7 मे

चौथा टप्पा- 13 मे

पाचवा टप्पा- 20 मे

सहावा टप्पा- 25 मे

सातवा टप्पा- 1 जून

सर्व मतदान पूर्ण झाल्यानंतर 4जून रोजी मतमोजणी

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत सांगितले की, आगामी लोकसभा निवडणूक प्रक्रियेत मतदान करण्यासाठी सुमारे 97 कोटी लोक पात्र आहेत. ज्येष्ठ नागरिक असलेल्या आणि 85 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मतदारांना घरून मतदान करण्याची परवानगी दिली जाईल. तसेच सर्व मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे अशा किमान मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून रोजी संपत आहे. त्यामुळे तत्पर्वी नवीन सभागृहाची स्थापना करण्यासाठी घटनात्मक पद्धतीने ही निवडणूक पार पडत आहे. आंध्र प्रदेश, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि ओडिशा विधानसभांचा कार्यकाळही जूनमध्ये संपणार आहे. त्यामुळे त्यांचीही निवडणूक यादरम्यानच घेतली जात आहे. (हेही वाचा, Lok Sabha Elections 2024 Schedule: लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर, आदर्श आचारसंहिता जारी)

दरम्यान, भारतीय निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा केल्यानंतर निवडणुकीदरम्यान उमेदवार आणि राजकीय पक्षांसाठी आदर्श आचारसंहिता (MCC) लागू झाली आहे. देशभरात निष्पक्ष निवडणुका सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने एमसीसी, निकाल घोषित होईपर्यंत ही आचारसंहिता कायम राहणार आहे. उमेदवार आणि राजकीय पक्षांनी MCC मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे आणि उल्लंघन झाल्यास, ECI कारवाई करू शकते. आदर्श आचारसंहिता सरकारांना निवडणुकीच्या रनअपमध्ये कोणत्याही लोकप्रिय योजना जाहीर करण्यापासून प्रतिबंधित करते. आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्टपणे निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेदरम्यान बजावले आहे. त्यामळे राजकीय पक्षांनाही निवडणूक प्रचारात विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. आयोगाच्या पावलांमुळे निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शी होईल, असे मानले जात आहे.