Insurance | Image Used for Representative Purpose Only | (Photo Credits: PTI)

जर तुम्ही लाइफ इन्शुरन्स पॉलिसी घेण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. मात्र तुम्हाला या संदर्भात काही शंका असेल तर ती तुम्हाला या लेखातून दूर होणार आहे. तर कोणत्याही कंपनीचे लाइफ इन्शुरन्स घेण्यापूर्व तुमच्या कोणत्या गरजा आहेत हे सुद्धा आधी ठरवा. तर लाइफ इन्शुरन्स हा एक आर्थिक प्लॅनिंगचा एक भाग आहे. परंतु तरीही काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या लाइफ इंन्शुरन्स घेण्यापूर्वी जरुर लक्षात घेणे आवश्यक आहे.(CAG: जाणून घ्या नक्की सरकारने केलेल्या खर्चाचा हिशोब कोण ठेवतो ?)

जर तुमच्या घरात कमवणाऱ्या व्यक्तीचा अचानक मृत्यू झाल्यस तर संपूर्ण घरावर विविध प्रश्न उपस्थितीत राहतात. यासाठी लाइफ इंन्शुरन्स हा पर्याय तुमच्यासाठी एक फायदेशीर मार्ग ठरु शकतो. कारण जेव्हा तुम्ही जवळपास नसाल तर तुमच्या परिवाराची आर्थिक मदत या पॉलिसीच्या माध्यमातून केली जाते. तसेच एखादा व्यक्ती निवृत्त होण्यास आला असेल किंवा झाला असेल तर परिवाराला आर्थिक चणचण भासण्याची गरज नाही. या प्रकारात लाइफ इंन्शुरन्स सोडणे समजून घेता येते.

तसेच तरुण वयात तुम्ही लाइफ इन्शुरन्स घेण्यापूर्वी विचार करा. कारण जो पर्यंत तुमच्यावर एखादा व्यक्ती अवलंबून नसतो. हिच वेळ असते जेव्हा लोकांवर होम किंवा कार लोन सारख्या जबाबदाऱ्या फार क्वचित असतात. त्याचसोबत ज्यांनी नुकतीच नोकरी करणे सुरु केले आहे ते लाइफ इंन्शुरन्सकडे काही काळासाठी दुर्लक्ष करु शकतात. मात्र जर तुम्ही विवाहित असाल तर जरुर लाइफ इंन्शुरन्स काढा. जसे जसे वय वाढते तसा इंन्शुरन्सचा प्रीमियम वाढतो.(E-RUPI Guide: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवे ई-रुपी डिजिटल पेमेंट सोल्यूशन केले लाँच, जाणून घ्या वापरायचं कसं ?)

लाइफ इंन्शुरन्स घेण्यापूर्वी तुम्ही तुमची एकूण किती कमाई आहे त्याचा सुद्धा विचार करा. कारण जर तुमच्याकडे पुरेशा प्रमाणत पैसे असून त्यामधून तुम्ही कर्ज किंवा तुमच्या मुलांचे संगोपन करण्यास सक्षम असाल तर याबद्दल विचार करणे काही प्रमाणत टाळलेले बरे. मात्र लाइफ इंन्शुरन्स अशा व्यक्तींसाठी फायदेशीर आहे ज्यांची आर्थिक परिस्थिती खालावली जरी गेली तरी त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो.