Kojagiri Purnima 2019 Wishes (Photo Credits: File Photo)

Sharad Purnima 2019: कोजागिरी पौर्णिमेला (Kojagiri Purnima) शरद ऋतूतील आश्‍विन महिन्यातील 'आश्‍विनी पौर्णिमा' असे म्हणतात. या दिवशी साक्षात लक्ष्मीदेवी येऊन चंद्रमंडळातून पृथ्वीवर उतरते आणि मध्यरात्री 'को जागर्ति' (म्हणजे 'कोण जागत आहे') असे म्हणत मनुष्याचे प्रयत्न पहात पृथ्वीतलावर संचार करीत असते अशी धारणा आहे. या दिवशी दूध आटवून त्यात केशर, पिस्ते, बदाम, चारोळी, वेलदोडे, जायफळ, साखर वगैरे गोष्टी घालून, लक्ष्मीदेवीला नैवेद्य दाखविला जातो. दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि मग ते दूध प्राशन केले जाते. उत्तररात्रीपर्यंत जागरण केले जाते.

आजकाल कोजागिरी पौर्णिमा कधीही असली तरी लोक आपल्या सोयीप्रमाणे शनिवार किंवा रविवार असा सुट्टीचा दिवस पकडून साजरी करतात. जेणेकरून त्यांना हा सण आनंदात आणि जल्लोषात साजरा करता येईल. मग रात्रभर जागरण करणे, धम्माल करणे अशी मजा त्यांना करता येते. यंदाची कोजागिरी पौर्णिमा ही रविवारीच आल्यामुळे कोजागिरी साजरी करण्याची धम्माल ही काही औरच असणार हे काही वेगळं सांगायची गरज नाही. यंदाची ही कोजागिरी अजून भन्नाट बनविण्यासाठी कोजागिरीच्या या भन्नाट शुभेच्छा देऊन आपल्या मित्रपरिवारासह नातलगांसह यंदाची कोजागिरी करा आणखी खास...

Kojagiri Purnima HD Wishes (Photo Credits: File)
Kojagiri Purnima HD Wishes (Photo Credits: File)
Kojagiri Purnima HD Wishes (Photo Credits: File)

हेदेखील वाचा- Kojagiri Purnima 2019: कोजागिरी पौर्णिमा साजरी करताना दूध चंद्राच्या छायेत का ठेवलं जातं? जाणून घ्या शास्त्रीय कारणं

Kojagiri Purnima HD Wishes (Photo Credits: File)
Kojagiri Purnima HD Wishes (Photo Credits: File)

हेदेखील वाचा- Kojagiri Purnima Messages: कोजागिरी पौर्णिमा मराठी शुभेच्छा देण्यासाठी Wishes, WhatsApp Status, GIFs आणि शुभेच्छापत्रं!

कोजागिरीला प्रत्येक प्रांतात वेगवेगळी नावाने ओळखले जाते. गुजरातमध्ये 'शरद पूर्णिमा', ओडिशामध्ये 'कुमार पौर्णिमा', बंगालमध्ये 'लोख्खी पूजो' असे म्हणतात. उपवास, पूजन व जागरण याचे या व्रतात महत्त्व आहे.कोजागरीच्या रात्री मंदिरे,घरे,रस्ते,उद्याने इ. ठिकाणी दिवे लावतात. लेटेस्टली मराठीकडून तुम्हालाही कोजागिरीच्या खूप सा-या शुभेच्छा!!!