Happy Kojagiri Purnima 2019 Messages: शारदीय नवरात्री नंतर येणारा सण म्हणजे कोजागिरी पौर्णिमा (Kojagiri Purnima). शरद पौर्णिमा (Sharad Poornima) म्हणून देखील ओळखला जाणारा हा सण भारतामध्ये अश्विन पौर्णिमेदिवशी साजरा केला जातो. यंदा 13 ऑक्टोबरच्या मध्यरात्री कोजागरी पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. लक्ष्मी पूजन करून कोजागरीच्या रात्री जागरण करण्याची प्रथा आहे. मग फेसबूक मेसेंजर, व्हॉट्सअॅप स्टेटस द्वारा कोजागरी पौणिमेच्या शुभेच्छा, शरद पौर्णिमेच्या शुभेच्छा शेअर करून तुमच्या सोबत तुमच्या मित्र परिवाराला, प्रियजनांसोबत ही मराठमोळी ग्रीटिंग्स, शुभेच्छापत्र, SMS, मेसेजेस नक्की शेअर करा आणि तुमचा आनंद द्विगुणित करा. Kojagiri Purnima 2019 Date: कोजागिरी पौर्णिमा दिवशी लक्ष्मी पूजनाची शुभ वेळ आणि महत्त्व काय?
हिंदू पुराणातील कथा आणि प्रथा परंपरेनुसार, कोजागरीच्या व्रतात रात्री लक्ष्मीची आणि ऐरावतावर बसलेल्या इंद्राची पूजा केली जाते. उपोषण, पूजन व जागरण यांना या व्रतात महत्त्व आहे. या व्रतात रात्रीच्या पहिल्या प्रहरी लक्ष्मी, इंद्र ,बळीराजा यांच्या प्रतिमांची पूजा करतात. त्यानंतर मसाले दूध, बासुंदी अशा गोडाच्या पदार्थांचे वाटप केले जाते.मग तुम्हीही यंदा कोजागरीची रविवार रात्र शारदाच्या टिपुर्या चांदण्यात घालवणार आहात? मग ही खास ग्रीटिंग्स नक्की शेअर करा.
कोजागरी पौर्णिमा शुभेच्छा
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दीक शुभेच्छा
कोजागिरी पौर्णिमेची रात्र लखलखते
दूधात देखणे रूप चंद्राचे दिसते
या शरद पौर्णिमेच्या तुम्हांला हार्दिक शुभेच्छा!
कोजागिरी पौर्णिमेचा दिवस
तुम्हाला खूप सुखकारक व आनंदाची
उधळण करणारा जावो हीच सदिच्छा
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!
हे दूध केशरी, कोजागिरीचे खास
वेलची, बदाम अन् पिस्ते खारे साथ
प्रार्थितो शरद पौर्णिमा शंभर, अशा निवांत
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!
हा चंद्र तुझ्यासाठी
ही रात्र तु्झ्यासाठी
आरास ही ताऱ्यांची
गगनात तुझ्याचसाठी
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!
कोजागरी पौर्णिमा शुभेच्छा GIFs
शरद पौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा देणारा व्हिडिओ संदेश
कोजागरी पौर्णिमेच्या रात्री अनेक ठिकाणी एकत्र बसून चांदण्याचा आनंद घेतला जातो. मसाले दूध, बासुंदी सारख्या गोड दूधाच्या पदार्थांचा आस्वाद घेतला जातो. काही ठिकाणी कोजागरीची रात्र जागवण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मग यंदा तुम्ही कोजागरी पौर्णिमा कशी साजरी करणार? हे आम्हांला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. लेटेस्टली परिवाराकडून कोजागरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!