केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी महाराष्ट्रातील (Maharashtra) तीर्थक्षेत्र आणि पर्यटन क्षेत्रांसंबंधी एक मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील पवित्र बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले श्री क्षेत्र भीमाशंकर (Bhimashankar) येथे देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांसाठी व पर्यटकांसाठी सोयीसुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने तीर्थक्षेत्रास जोडणाऱ्या खेड - भीमाशंकर या राज्यमार्ग (Khed Bhimashankar Highway) रस्त्यास राष्ट्रीय महामार्गाचा (National Highway) दर्जा देण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या (Central Government) वतीने घेण्यात आला आहे. या नव्या महामार्गाची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. या महामार्गामुळे भीमाशंकर व माळशेज घाट (Malshej Ghat) हे पर्यटन वर्तुळ सहज शक्य होणार आहे.
महाराष्ट्रातील पर्यटनाच्या (Maharashtra Tourism) दृष्टीकोणातून ही आनंदाची बातमी आहे. या महामार्गाच्या माध्यमातून रोजगार (Employment), वाहतूक (Transportation), दळणवळणाच्या सोई, पर्यटन (Tourism), शैक्षणिक (Education) आणि औद्योगिक विकास साधन्यास मदत होणार आहे. हा महामार्ग 70 किमी लांबीचा असुन राजगुरूनगर (Rajgurunagar) (खेड), चास , वाडा, तळेघर (Taleghar) ही काही महत्त्वाची शहरे जोडली जाणार आहेत. या महामार्गामुळे भीमाशंकरला येणाऱ्या भाविकांसाठी दळणवळण सोयीचे होईल. तसेच भीमाशंकर परिसरातील शेतीमाल मुंबई (Mumbai) बंदराकडे पोहोचवणे सुलभ होईल. देशभरात सर्वदूर राष्ट्रीय महामार्गांचे जाळे विणून देशातील तीर्थक्षेत्रांचा व पर्यटन क्षेत्रांचा विकास साधण्याचा मानस असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितल आहे. ( हे ही वाचा:-Nitin Gadkari: देशाच्या लोकसंख्याएवढे वृक्ष लागवड करणार, केंद्रीय मंत्री नितिन गडकरींचा नवा निर्धार)
...तीर्थक्षेत्रास जोडणाऱ्या खेड - भीमाशंकर या राज्य मार्ग रस्त्यास राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या वतीने घेण्यात आला आहे. #PragatiKaHighway #GatiShakti
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) July 18, 2022
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कायमच त्यांनी केलेल्या निर्धारांसाठी आणि केलेल्या निर्धाराच्या अंमलबजावणीसाठी ओळखल्या जातात. केवळ सत्ताधारी पक्षचं नाही तर विरोधीपक्षासह सर्वसामान्य नागरिकांकडूनही नितीन गडकरींच्या कामाचं कौतुक होत. काश्मिर ते कन्याकुमारी पर्यत देशभरात गडकरींनी रस्ते बांधकाम केलं, सर्वस्तरासून त्यांच्या कामाचं कौतुक होताना दिसत. तरी महाराष्ट्रातील हा नवा राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्राच्या दृष्टीने कसा मदतीचा असेल हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.