Social Media: सरकारसाठी सुरक्षित तर नागरिकांसाठी असुरक्षित हेचं केंद्र सरकारचं धोरण, कपील सिब्बल यांची केंद्र सरकारच्या नवीन धोरणावर सडकून टीका
File image of Congress leader Kapil Sibal | (Photo Credits: PTI)

फेसबूक (Facebook) आणि ट्वीटर (Twitter) संबंधीत काहीही तक्रार असली तरी या दोन्ही सोशल मिडीया (Social Media) वापरकर्त्यांना आता थेट केंद्र सरकराकडे (Central Government) तक्रार करता येणार आहे.  केंद्र सरकारकडून आता सोशल मिडीया तक्रार केंद्र (Social Media Complain Pannel) स्थापन करता येणार आहे, जिथे युजर्सना ट्विटर (Twitter) आणि फेसबुक (Facebook) संबंधित तक्रार दाखल करता येईल. त्यामुळे यापुढे तुम्हाला फेसबुक आणि ट्विटर सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मबाबत (Social Media Platform) काही तक्रार करायची असेल तर सरकारच्या तक्रार कक्षाची मदत होणार आहे. पण केंद्र सरकारच्या या सोशल मिडीया कक्षावर समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी आयटी मंत्री कपील सिब्बल (Kapil Sibbal) यांनी विरोध दर्शवला आहे. तसेच केंद्र सरकारचं (Central Government) हे सोशल मिडीया तक्रार कक्ष (Social Media Complain Pannel) सरकारसाठी सुरक्षित आणि नागरिकांसाठी असुरक्षित असल्याची टीका कपील सिब्बल यांनी केली आहे.

 

आधी केंद्र सरकाराने (Central Government) टीव्ही नेटवर्क (Television Network) काबीज केले आणि आता ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (Social Media Platform) काबीज करणार आहेत.हे मीडियाचे सर्वसमावेशक कॅप्चर आहे. भारत सध्या एकपक्षिय देश, एक शासन प्रणालीच्या दिशेन प्रवास करतोय. लोकशाहीच्या दृष्टीने हे ठीक नाही असं मत कपिल सिब्बल यांनी मांडलं आहे. (हे ही वाचा:- Rahul Gandhi: सरकारी दबावामुळे भारतात विरोधकांचा आवाज दाबणार नाही, ट्वीटरच्या मोठ्या घडामोडीनंतर कॉंग्रेस नेते राहुल गांधींचं सुचक ट्वीट)

 

सरकारसाठी सुरक्षित आणि इतरांसाठी असुरक्षित, हेच या सरकारचे धोरण कायम राहिले आहे... सर्वसामान्य नागरिकांसाठी सोशल मीडिया हे एकमेव व्यासपीठ उरले आहे. जेव्हा बदनामीकारक विधाने केली जाईल तेव्हा लोकांवर कारवाई केली जाईल पण सोशल मिडीया तक्रार केंद्र स्थापन करण लोकशाहीसाठी बरं नव्हे अशी प्रतिक्रीया माजी आयटी मंत्री कपिल सिब्बल यांनी दिली आहे.