Kanpur: 'आता मृतदेह मोजायचे नाहीत' Omicron मुळे त्रस्त झालेल्या डाॅक्टरने पत्नीसह दोन मुलांची केली हत्या
Murder | Representational Image | (Photo Credits: stux/Pixabay)

उत्तर प्रदेशातील कानपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका डाॅक्टरने त्याची पत्नी आणि स्वत:च्या दोन मुलींची हत्या केली आहे. हा प्रकार केल्यानंतर डाॅक्टरने त्याच्या भावाला मेसेज करुन पोलिसांनी बोलावण्यास सांगितले. भाऊ यायच्या आधीच त्याने पळ काढला होता. पोलिसांना घटनास्थळी एक नोट मिळाली त्यात त्याने हत्येमागचे कारण ओमिक्राॅन व्हायरस असल्याचे म्हटले होते. तसेच त्याने आता मृतदेह मोजायचे नाहीत असे ही लिहिले होते.

घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी तिघांचे मृतदेह शवविच्छदनासाठी दिले. तर डाॅक्टर हा गेल्या काही दिवसांपासून तणावाखाली होता. मृतदेहाजवळ एक हतोडा सुद्धा दिसून आला. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडवली आहे. सुशीलने लिहिलेल्या नोटमध्ये असे म्हटले होते की, मी एका गंभीर आजाराचा सामना करत आहे. त्यामुळे परिवाला त्रासात पाहू शकत नाही. माझा आत्मा मला माफ करणार नाही. तसेच ओमिक्रॉनचा उल्लेख करत त्याने म्हटले की, आता मृतदेह मोजायचे नाहीत. ओमिक्रॉन सर्वांना मारुन टाकणार. माझ्या बेजबाबदारपणामुळे मी या स्तराला पोहचलो आहे. येथून निघणे मुश्किल आहे.(Uttar Pradesh: कॉलेजमध्ये शिरलेल्या बिबट्याचा विद्यार्थ्यावर हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद Watch Video)

असे सांगितले जात आहे की, सुशील हा कानपुर मधील रामा मेडिकल कॉलेजच्या फॉरेंसिक विभागात एचओडी आहे. त्याने कानपुर मेडिकल कॉलेजमधून शिक्षण घेतले आहे. हत्येचे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांकडून त्याचा शोध घेतला आहे. घटनास्थळी एक डायरी सुद्धा मिळाली त्यात ओमिक्रॉन हेच हत्येचे कारण असल्याचे म्हटले होते.