Uttar Pradesh: कॉलेजमध्ये शिरलेल्या बिबट्याचा विद्यार्थ्यावर हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद  (Watch Video)
Leopard enters college classroom in Aligarh district (Photo/ANI)

उत्तर प्रदेश (Uttar Prdesh) राज्यातील अलीगढ (Aligarh) जिल्ह्यातील छर्रा परिसरातील चौधरी निहाल सिंह इंटर कॉलेज (Chaudhary Nihal Singh Inter College) येथे एका बिबट्याने (Leopard ) धुमाकूळ घातला. कॉलेज परिसरात घुसलेल्या बिबट्याने विद्यार्थ्यांवर हल्ला चढवला. यात एक विद्यार्थी जखमी झाला. जखमी विद्यार्थ्याला नजिकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, वन विभाग आणि आगरा येथील आय वाइल्ड लाईफ टीमने बिबट्याला पकडण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन राबवले. जवपास नऊ तास चाललेल्या पाठशिवणीच्या खेळानंतर बिबट्याला जेरबंद करण्यास यश आले.

वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा बिबट्या भटकत भटकत नरौरा किंवा गंगा किनाऱ्यावरुन कॉलेज परिसरात आला असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार, बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव लखीराज असे आहे. या विद्यार्थ्याने पोलिसांना सांगितले की, तो (विद्यार्थी) वर्गात शिरताच आगोदरपासूनच वर्गात घुसलेला बिबट्या पाहायला मिळाला. बिबट्याला घाबरुन मी पाठिमागे फिरलो मात्र इतक्यात बिबट्याने माझ्यावर झडप घातली. त्याने मला अनेक पंजे मारले आणि चावाही घेतला. विद्यार्थ्यात्याच्या हातावर मोठ्या जखमा पाहायला मिळत आहेत. घटनेची माहिती कळताच पोलिस आणि वन विभागाचे एक पथक घटनास्थळी पोहोचले. (हेही वाचा, Leopard Rescued In Junnar: जुन्नरमध्ये विहिरीत पडलेल्या बिबट्याची वन विभागाकडून सुटका)

ट्विट

कॉलेजमध्ये परीक्षा सुरु आहेत. त्यामुळेविद्यार्थी बुधवारी नेहमीप्रमाणे परीक्षा देण्यासाठी कॉलेजमध्ये पोहोचले. कॉलेजच्या दुसऱ्या मजल्यावर खोली क्रमांक-10 वर वर्ग भरतो. येथे सकाळी 8.30 वाजता परिक्षा देण्यासाठी काही विद्यार्थी वर्गात पोहोचले. त्याच वेळी आत दबा धरुन बसलेल्या बिबट्याने विद्यार्थ्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात लखीराज नावाचा विद्यार्थी जखमी झाला. बिबट्या कॉलेजमध्ये आल्याची माहिती मिळताच विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घाबरलेले विद्यार्थी सैरावैरा धावू लागले. काहींनी छताचा आश्रय घेतला.

ट्विट

वन विभागाने हा बिबट्या 7 ते 8 वर्षे वायाचा असल्याची शक्यता व्यक्त केलीआहे. त्यांनी पूर्ण वाढ झालेला बिबट्य अतिशय धोकादायक असतो असेसांगितले. पूर्ण वाढ झालेला बिबट्या असल्यामुळे त्याने अनेक वेळा वन विभागाला चकवा दिला. ज्यामुळे रेस्क्यू ऑपरेशन काहीसे लांबले. दरम्यान आता बिबट्याला जेरबंद केले असून घाबरण्याचे कारण नाही. त्याला लवकरच जंगलात सोडले जाईल अशी माहितीही वन विभागाने दिली आहे.