भारतीय सेना (Photo Credits: PTI)

जम्मू काश्मीर (Jammu & Kashmir) मधील पुलवामा (Pulwama) जिल्ह्यातील बंडझू (Bandzoo) भागात भारतीय सैन्य आणि पोलिसांनी चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार केले आहे. आज पहाटेच्या सुमारास याठिकाणी दोन्ही गटांंमध्ये चकमक सुरु झाली होती. यावेळी चकमकीत गोळी लागुन सीआरपीएफ चे एक जवान सुद्धा शहीद झाले आहेत. सुरुवातीला या जवानाने गोळी लागुनही प्राण सोडले नव्हते मात्र हॉस्पिटल मध्ये नेल्यावर उपचाराच्या दरम्यान त्यांचा मृत्यु झाला. प्राप्त माहितीनुसार पोलिसांनी ठार झालेल्या दहशतवाद्यांकडुन 2 AK-47 बंंदुका जप्त केल्या आहेत. तर या भागात अजुनही सर्च ऑपरेशन सुरु आहे. जम्मू कश्मीर: लकड़पोरा भागामध्ये दहशतवाद्यांविरोधी सर्च ऑपरेशन पूर्ण; JeM चा एक दहशतवादी ठार दुसरा फरार

दक्षिण काश्मीर मधील बंडझु भागात दहशतवादी अड्डा असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सोमवारी मध्यरात्रीपासुनच सर्च ऑपरेशन आरंंभले होते, या वेळी दहशतवाद्यांकडुन सुरुवातीला ऑपरेशन मधील जवानांवर गोळीबार केला गेला. याला प्रत्युत्तर देताना भारतीय जवानांनी सुद्धा दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. जम्मू काश्मीर मधील कठुआ परिसरात आढळलेल्या पाकिस्तानी ड्रोनमधून अनेक शस्त्रात्रं जप्त; मोठा हल्ला करण्याचा मानस- BSF.

ANI ट्विट

दरम्यान, सोमवारी पुलवामा मधीलच बाटांगूड भागात सीआरपीएफ च्या कॅम्पवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला होता, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.