छत्तसीगडमधील बस्तर आणि भगवान श्रीरामाचं घट्ट नातं आहे. हे एक असं घटदाट वन आहे जिथे भगवान श्रीरामांनी काही दिवस वास्तव्य केल्याचा दावा केला जातो. सुकमामधील केरलापेंदा गावात 1970 मध्ये रामभक्तांनी एक मंदिर बांधलं होतं. 33 वर्षे या मंदिरात दररोज पूजाअर्चा होत होती. मात्र 2003 मध्ये माओवाद्यांनी हे मंदिर जबरदस्तीने बंद केलं होतं.  सीआरपीएफच्या जवानांनी तब्बल 21 वर्षांनी हे मंदिर उघडून, मंदिराची स्वच्छता करून भाविकांसाठी खुलं केलं आहे. मंदिर उघडल्यानंतर सीआरपीएफच्या जवानांनी मंदिात दिवा लावला, तिन्ही मुर्त्यांना हार-फुलं वाहून पूजा केली. (हेही वाचा - Indian Stock Market News: भारतीय शेअर बाजारात विक्रमी तेजी, सेन्सेक्स 75,000 पार, निफ्टीनेही नोंदवला नवा उच्चांक)

केरलापेंदामधील या मंदिरात पाच दशकांपूर्वी भगवान श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली होती. बिहारी महाराज यांनी 1970 मध्ये हे मंदिर उभारलं होतं असं स्थानिक सांगतात. हे मंदिर बांधण्यासाठी आसपासच्या गावांमधील लोकांनी वर्गणी गोळा करून पैसे जमवले होते. मात्र 90 च्या दशकानंतर या भगात माओवाद्यांचा उद्रेक वाढला. अशातच 2003 मध्ये माओवाद्यांच्या भितीने मंदिरातील पूजा बंद करण्यात आली.

पाहा व्हिडीओ -

केरलापेंदा गावातील 95 टक्क्यांहून अधिक लोक शाकाहारी असल्याचा दावा येथील ग्रामस्थांनी केला. तसेच गावातील लोकांना मद्याचं व्यसन नसून याचं श्रेय बिहारी महाराज आणि या मंदिराला जातं असंही गावकऱ्यांनी सांगितलं. या गावात पूर्वी मोठी यात्रा भरायची. अयोध्येतून साधू आणि संन्यासी यायचे. परंतु, या भागात माओवाद्यांचा उद्रेक वाढल्यानंतर यात्रा बंद पडली.