भारतीय शेअर बाजारात (Indian Stock Market) मंगळवारी अभूतपूर्व उच्चांक पाहायला मिळाला. सेन्सेक्स (Sensex) आपल्या आजवरच्या इतिहासातील सर्व विक्रम मोडीत काढीत 75,000 अंकांच्या पार गेला तर निफ्टीनेही (Nifty 50) उंच्चांक नोंदवला. निफ्टी देखील 22,700 पातळीच्या वर गेला. बाजारात आलेली ही हिरवळ खरेदीदारांना चांगलाच नफा देऊन गेली. खास करुन आज गुढीपाडवा. मराठी नववर्षाचा प्रारंभ. त्यामुळे शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या मराठी गुंतवणुकदारांसाठी आजचा दिवस विशेष आनंदाचा पाहायला मिळाला.
आज (9 एप्रिल) सकाळी भारतीय शेअर बाजार सुरु झाला तेव्हा 30 शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स 381.78 अंक किंवा 0.51% वाढून 75,124.28 वर पोहोचला, तर NSE चा निफ्टी 50 98.8 अंकांनी किंवा 0.44% वर चढून 210556 वर उघडला. त्याचबरोबर, बँक निफ्टी निर्देशांकाने 229.10 अंकांनी किंवा 0.47% वाढीसह 48,810.80 वर व्यापार सुरू केला. (हेही वाचा, SEBI Bans Naked Short Selling: नेकेड शॉर्ट सेलिंग नियमात बदल, संस्थात्मक गुंतवणूकदाराला डे ट्रेडिंग करण्यास परवानगी नाही- सेबी)
बाजारातील कामगिरीवर भाष्य करताना, एचडीएफसी सिक्युरिटीजचे एमडी आणि सीईओ धीरज रेल्ली यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, बाजारातील तेजीस अनेक घटक कारणीभूत असल्याचे म्हटले. ते म्हणाले, गुंतवणूकदारांसाठी आर्थिक वर्ष 2024 विशेष ठरु शकते. या वर्षात भारतीय शेअर बाजार भारतीय इक्विटी बाजार नवीन क्षेत्राकडे कूच करत आहेत. आगामी सार्वत्रिक निवडणुकांमधून गुंतवणूकदारांना वाटत असलेली अनुकूल परिणामाची आशा आणि त्यानंतरच्या धोरणात्मक जोरामुळेही खरेदीदार उत्साही आहेत. मासिक/वार्षिक डेटा आणि काही प्रोत्साहनाच्या घोषणा. कंपन्यांच्या ऑपरेशनल/ऑर्डर घोषणा स्टॉक-विशिष्ट खरेदीला आकर्षित करत आहेत. लाईव्हमिंटने याबाबत वृत्त दिले आहे. (हेही वाचा, हेही वाचा, Indians Saving And Investment: बँकांमधील बचत घटतीय, भारतीयांचा पैसा जातोय तरी कोठे? काय आहे गुंतवणूक फंडा?)
दरम्यान, आघाडीच्या निर्देशांकांमध्ये वाढ असूनही, धीरज रेल्ली यांनी गुंतवणुकदारांना स्मॉल/मिडकॅप समभागांमध्ये होत असलेल्या वाढिबाबत सावधानता बाळगण्यास सांगितले. त्यांनी व्यापक बाजाराच्या लँडस्केपमध्ये विवेकपूर्ण गुंतवणूक धोरणांच्या महत्त्वावर जोर दिला. भारतीय शेअर बाजारातील विक्रमी चढाओढ गुंतवणूकदारांचा आशावाद आणि देशाच्या आर्थिक संभावनांवरील विश्वास अधोरेखित करते. चालू घडामोडी आणि धोरणात्मक उपक्रमांसह, बाजारातील सहभागी जागरुक राहतात, विकसित होत असलेल्या विस्ताराचा काळजीपूर्वक विचार करून मार्गदर्शन करतात.
दरम्यान, बाजारात दिसत असलेली तेजी ही गुंतवणूकदारांना आकर्षित करत असली तरी ती चिरंतन टिकणारी असत नाही. त्यामुळे बाजाराची पूर्वपिठीका पाहणेही महत्त्वाचे ठरते. तुम्ही जर दिर्घकालीन गुंतवणूकदार असाल तर तुम्हाला फार चिंता करण्याचे कारण नाही. मात्र, तुम्ही लघुकालावधीसाठी गुंतवणूक करुन आर्थिक मोबदला मिळविण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला वेळीच सावध होणे गरजेचे आहे. खास करुन, स्मॉल आणि मीडियकॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणुकदारांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.