Terrorist (File Image)

भारतामध्ये काल (20 जून) पासून कुलगाम (Kulgam) येथील लकड़पोरा (Lakadpora) भागामध्ये कुलगाम पुलिस, लष्कर आणि CRPF द्वारा दहशतवाद्यांविरोधी सर्च ऑपरेशन सुरू होते. आज (21 जून) ते संपल्याची माहिती जम्मू कश्मीर पोलिस सोर्सकडून देण्यात आली आहे. दरम्यान जैश-ए-मोहम्मद (Jaish-e-Mohammed) या दहशतवादी संघटनेच्या एका पाकिस्तानी आतंकवाद्याला या सर्च ऑपरेशनमध्ये कंठस्नान घालण्यामध्ये भारताला यश आलं आहे. दरम्यान हा दहशतवादी मागील काही वर्षांपासून दक्षिण कश्मीर मध्ये सक्रिय होता. तर एक आतंकवादी पळून जाण्यात यशस्वी ठरला आहे. अशी माहिती देखील जम्मू कश्मीर पोलिसांकडून देण्यात आली आहे. जम्मू काश्मीर मधील कठुआ परिसरात आढळलेल्या पाकिस्तानी ड्रोनमधून अनेक शस्त्रात्रं जप्त; मोठा हल्ला करण्याचा मानस- BSF.

दरम्यान भारताकडून करण्यात आलेल्या या सर्च ऑपरेशनमध्ये दोन हत्यारं हस्तगत करण्यात आली आहेत. दरम्यान कठुआ भागात पाकिस्तानी ड्रोन शूट केल्यानंतर ज्या कंपनीची हत्यारं आढळली होती तीच आज या सर्च ऑपरेशनमध्येही आढळली आहेत.दरम्यान यामध्ये AK-47 रायफल आणि M4 US made rifle चा समावेश आहे. ड्रोन द्वारा जैश-ए-मोहम्मद चा पाकिस्तानी आतंकवादी अली भाई पर्यंत हत्यारं पोहचवण्याचा प्लॅन असल्याचीदेखील चर्चा आहे. सध्या ही व्यक्ती दक्षिण कश्मिरमध्ये सक्रिय आहे.

ANI Tweet

दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून श्रीनगर मध्ये आज मोबाईल इंटरसेवा देखील बंद ठेवण्याचा निर्नय अधिकार्‍यांनी घेतला होता. कायदा व सुव्यवस्था राहण्यासाठी जम्मू कश्मीर मध्ये काही शहराच्या विशिष्ट भागात प्रतिबंध घालण्यात आला होता. तर आज श्रीनगर (Srinagar) स्थित जैदीबल  भागात  ताब्यात घेण्यात आलेल्या 3 आतंकवाद्यांच्या पालकांना बोलावून घेण्यात आलं आहे. त्यापैकी एकाचा मागील महिन्यात बीएसएफ जवानावर प्राणघातक हल्ला करण्याच्या कटातही समावेश असल्याची माहिती देण्यात आली आहे.